घराच्या मुख्य प्रवेशदारावर ठेवू नका “या’ वस्तू; अन्यथा होईल तुमचे मोठे नुकसान

नवी दिल्ली : घराच्या प्रवेशदारावरून घराची ओळख ठरते. घरातील लोक कशा स्वभावाचे आहेत, आचारविचार, आहारविहार कसा आहे हे घरावरून कुणाच्याही लक्षात येतेच. घराच्या प्रवेशद्वारातून लक्ष्मी घरात प्रवेश करते. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वार नेहमीच स्वच्छ व सजवलेले असले पाहिजे. घरात लक्ष्मीचे व सकारात्मक ऊर्जेचे वास्तव्य रहावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र घरातल्या मुख्य प्रवेशद्वारात ठेवलेल्या काही वस्तूंमुळे …
 
घराच्या मुख्य प्रवेशदारावर ठेवू नका “या’ वस्तू; अन्यथा होईल तुमचे मोठे नुकसान

नवी दिल्ली : घराच्या प्रवेशदारावरून घराची ओळख ठरते. घरातील लोक कशा स्वभावाचे आहेत, आचारविचार, आहारविहार कसा आहे हे घरावरून कुणाच्याही लक्षात येतेच. घराच्या प्रवेशद्वारातून लक्ष्मी घरात प्रवेश करते. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वार नेहमीच स्वच्छ व सजवलेले असले पाहिजे. घरात लक्ष्मीचे व सकारात्मक ऊर्जेचे वास्तव्य रहावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र घरातल्या मुख्य प्रवेशद्वारात ठेवलेल्या काही वस्तूंमुळे लक्ष्मी रुसते आणि घरात प्रवेश करत नाही, असे वास्तुशास्‍त्रात सांगितले आहे.

या वस्तू प्रवेशद्वारात नकोच…

  • घराच्या मुख्यप्रवेश द्वारात चप्पल चुकूनही कधीच ठेवू नये. चपलांचे कपाटसुद्धा दरवाजात ठेवू नये. असे केल्याने घरात लक्ष्मीचे येणे बंद होते आणि घरात आर्थिक नुकसानीच्या घटना घडतात. घरात खर्च वाढतो आणि पैशाची आवक कमी होते.
  • त्याचप्रमाणे दरवाजात मनी प्लांट सुद्धा ठेवू नये. मनी प्लांट हे पैशाचे झाड समजले जाते. प्रवेशद्वारात असल्याने सर्वांची नजर त्याच्यावर जाते. त्यामुळे घरातील संपत्ती कमी होऊ लागते. घरातील मुख्य दरवाजावर काटेरी झुडूपसुद्धा लावू नये. त्यामुळे घरातील माणसांमध्ये प्रेम न राहता सतत वादविवाद होत राहतात.
  • घराच्या मुख्य प्रवेशद्वारात लक्ष्मीची मूर्ती ठेवू नये असेही मानले जाते. जर ठेवली असेल तर मूर्तीची नियमित पूजा होणे अपेक्षित आहे. मात्र घराबाहेर ठेवलेल्या मूर्तीची पूजा करण्यास लोक विसरतात. लक्ष्मीचे मुखही घराबाहेरच्या दिशेने असणे चांगले नाही. त्यामुळे घरातील संपत्ती बाहेर जाऊ लागते. त्यामुळे लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो दरवाजावर लावू नये.
  • तुटलेले सामान, कचरा, झाडू मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवू नये. विशेषतः झाडूला कधीही पायांचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. लोकांच्या नजरेत भरणार नाही अशा ठिकाणी झाडू ठेवावा.

असे असावे आपल्या घराचे प्रवेशद्वार…

  • घराचे प्रवेशद्वार नेहमी उत्तर, उत्तर-पूर्व अथवा पश्चिम दिशेला उघडेल असे असावे. दक्षिण, दक्षिण-पश्चिम अथवा दक्षिण -पूर्व या दिशेला मुख्य द्वार असू नये.
  • मुख्य दरवाजावर गणपती किंवा कोणत्याही देवी देवतांचे फोटो असू नयेत. गणपतीची पाठ दिसेल अशी मूर्ती ठेवू नये.
  • मुख्य दरवाजावर लक्ष्मीची घरातल्या दिशेने जाणारी पाऊले असावी.
  • मुख्य दरवाजावर सुंदर आणि सजावटीची झाडे असावे. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात खेळती राहील.