आधी नोकरी मग छोकरी…
प्रेम आणि करिअर यांच्यातून नक्की कशाला प्राधान्य द्यायचं असा संभ्रम अनेकांना पडतो. पण अनेक घटना अशा घडतात की त्यावेळी दोन्हींपैकी एकाच गोष्टीची निवड करावी लागते. या दोन्ही गोष्टी आयुष्यात तितक्याच महत्त्वाच्या असल्यामुळे नेमकं काय जवळ करायचं हा मात्र अनेकांसाठी यक्षप्रश्न आहे. आजच्या कॉलेजिअन्सच्या मते मात्र करिअर हेच सर्वाधिक महत्त्वाचं आहे. भावना, इमोशन्सपेक्षा आजच्या युथची पसंती प्रॅक्टिकल अप्रोचला आहे. करिअरच्या संधी पुन्हा पुन्हा येत नाहीत पण प्रेम मात्र पुन्हा करता येऊ शकतं. उगीच भावनेच्या भरात निर्णय घेऊन नंतर करिअरचा बोर्या वाजण्यापेक्षा वेळीच करिअरचा विचार केलेले बरा, असं हुश्शार कॉलेजियन्स म्हणतात. इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा प्रेमालाच महत्त्व देण्यात मुली कायमच पुढे असतात. भावनिक गुंतागुंतीत स्वत:ला पूर्णपणे झोकून देणार्या मुलीही आता करिअरला जवळ करू लागल्या आहेत. टेक इट लाइटली आवडत्या व्यक्तीला प्रपोज करणं हे काही नवीन नाही. पण यामध्ये सिरियस होण्यापेक्षा या प्रपोजल्सना लाइटली घेण्याकडेच कॉलेजिअन्सचा ओढा आहे. मजामस्ती म्हणून होकार द्यायचा, थोडे दिवस फिरायचं, टाइमपास करायचा आणि कंटाळा आला की बाय-बाय करायचं. या प्रपोजल्सना सिरियस व्हॅल्यूपेक्षा मस्करीचा टचच जास्त आहे. पण या मजा-मस्तीतून कधीकधी खरं प्रेमही सापडू शकतं. जर समोरच्या व्यक्तीबाबत मनात खरंच काही भावना असतील तर प्रपोजल सिरियसली घ्यायला काहीच हरकत नाही, याची कबुलीही कॉलेजिअन्स देतात. 45 टक्के यूथ प्रपोजल मस्करीत घेतात तर 14 टक्के मात्र याबाबतीत सिरियस आहेत. डेटिंगचे पर्याय – बाइक किंवा कारने लाँग ड्राइव्हवर जाणं. – बीचवरून अनवाणी फिरणं. – अनेकांसाठी बीच कॅण्डल लाइट डिनर ही ड्रीम डेट आहे. – डोंगरावर जाऊन अगदी उंच शिखरावर रात्रीचं आकाश बघणं.