सावधान… क्यूआर कोड स्कॅनिंगद्वारे तुम्हालाही घातला जाऊ शकतो गंडा!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एक व्यक्ती ऑनलाइन वस्तू विक्री करण्याची माहिती एका वेबसाइटवर प्रसिद्ध करते… समोरील व्यक्ती वस्तू खरेदी करण्याची उत्सुकता दाखवून, पैसे देण्यासाठी क्यूआर कोड पाठवते… वस्तू विकणारी व्यक्ती हा क्यूआर कोड स्कॅन करते. मात्र तिच्या खात्यात वस्तूचे पैसे येण्याऐवजी ते कापले जातात… क्यूआर कोडच्या माध्यमातून अशा पद्धतीने नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार अलीकडे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एक व्यक्ती ऑनलाइन वस्तू विक्री करण्याची माहिती एका वेबसाइटवर प्रसिद्ध करते… समोरील व्यक्ती वस्तू खरेदी करण्याची उत्सुकता दाखवून, पैसे देण्यासाठी क्यूआर कोड पाठवते… वस्तू विकणारी व्यक्ती हा क्यूआर कोड स्कॅन करते. मात्र तिच्या खात्यात वस्तूचे पैसे येण्याऐवजी ते कापले जातात… क्यूआर कोडच्या माध्यमातून अशा पद्धतीने नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत.

चहाच्या टपरीपासून ते मोठ्या दुकानांमध्ये सोप्या पद्धतीने बिल भरणा करण्याची क्यूआर कोड स्कॅनर वापरला जातो. सायबर गुन्ह्यांबाबत काम करणार्‍या अ‍ॅड. मयुरी लातूरकर म्हणाल्या, नागरिक क्यूआर कोडच्या पैसे देतात. मात्र, संबंधित क्यूआर कोड स्कॅन करताना, तो खरा की खोटा हे पाहण्याची खबरदारी घेतली जात नाही. क्यूआर कोडच्या माध्यमातून पैशाबरोबरच इतर बाबीदेखील हॅक केल्या जात आहेत. त्यामुळे स्वतःच्या डिव्हाइसचा क्यूआर कोड दुसर्‍याकडे स्कॅन करताना काळजी घेण्याची गरज आहे. सायबर चोरटे मालेसिएस नावाच्या सॉफ्टवेअरद्वारे क्यूआर कोडची माहिती चोरतात. त्या माध्यमातून दुसरा क्यूआर कोड तयार करून, त्या माध्यमातून व्यवहार केला जातो. त्यामुळे फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे.

  • ही काळजी घ्यावी…
  • क्यूआर कोड स्कॅन करून व्यवहार करताना एरर आल्यास व्यवहार करू नये.
  • स्कॅन करताना समोरच्या युजरचा यूआरएल न दिल्यास सावध व्हावे.
  • कोड स्कॅन केल्यानंतर दुकान अथवा व्यक्तीऐवजी दुसरे नाव असेल तर सावध राहा.
  • क्यूआर कोड स्कॅन करत असलेला मोबाईलमध्ये रिअल टाईम प्रोटक्शन घ्या.
  • अनोळखी व्यक्तीकडून आलेले क्यूआर कोड स्कॅन करू नका.
  • पैसे घेण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज नाही हे लक्षात ठेवा.

क्यूआर कोडच्या गुन्ह्यांत 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. सायबर चोरट ऑनलाइन खरेदी-विक्री करताना क्यूआर कोड पाठवून अगोदर दहा रुपये पाठवायला सांगतात. त्यानंतर दुसरा क्यूआर कोड पाठवितात. अशा वेळी बँकिंग डेटा चोरण्यासाठी क्यूआर कोडचा वापर केला जाऊ शकतो.

– अ‍ॅड. मयुरी लातूरकर