मोबाइलवर अश्लील चित्रपट पाहताय? मग “हे’ वाचाच!

नवी दिल्ली ः मोबाईलवर पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आतातर अनेक ॲप्सचा वापर करूनही पॉर्न पाहणं सोपं झालं आहे. स्मार्टफोनवरून पॉर्न पाहणं समस्याजनक ठरू शकतं. मोबाईलवर जे आपण पाहतो, ते कुणीतरी पाहत असतं. पॉर्न साईट्स फ्री असतात; पण अनेकदा काही पॉर्न साईट्सवर नुसतं क्लिक जरी केलं तरी खिशाला चाट बसलीच म्हणून समजा. पॉप्युलर पॉर्न वेबसाईट्स …
 

नवी दिल्ली ः मोबाईलवर पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आतातर अनेक ॲप्सचा वापर करूनही पॉर्न पाहणं सोपं झालं आहे. स्मार्टफोनवरून पॉर्न पाहणं समस्याजनक ठरू शकतं. मोबाईलवर जे आपण पाहतो, ते कुणीतरी पाहत असतं.

पॉर्न साईट्स फ्री असतात; पण अनेकदा काही पॉर्न साईट्सवर नुसतं क्लिक जरी केलं तरी खिशाला चाट बसलीच म्हणून समजा. पॉप्युलर पॉर्न वेबसाईट्स या गैरकायदेशीर पद्धतीने व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसशी जोडून जास्त पैसे कमावतात. अशावेळी अनेकदा या सर्व्हिसेस अचानक ॲक्टिव्हेट होतात. आपोआप तुमच्या खिशातून पैसे जातात पॉर्न साईट्समध्ये कधी कधी असे व्हायरस असतात, ते फोन लॉक करतात. नंतर अनलॉक करण्याच्या बदल्यात पैशाची मागणी करतात. आजकाल अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत.

स्मार्टफोनवर पॉर्न मूव्ही बघण्यासाठी ॲप डाऊनलोड केलं, तर अनेक व्हायरस येतात. फोनवर पर्सनल जीमेल आयडीने लॉगईन केले असेल आणि पॉर्न बघितली, फोनची सिक्युरिटी सायबर क्रिमिनल्सच्या हातात जाऊ शकते. पॉर्न पाहताना फेसबुकने लॉग इन केलं असेल, तर फेसबुक अकाऊंटही हॅक होतं. पॉर्न पाहिल्यानंतर तुमच्या फोनची इंटरनेट सर्फिंग हिस्ट्री डिलीट करा. फोनचा कॅशेही क्लियर करा. ‘Do not allow website to track’ फीचर सोबत इन्कॉगनिटो मोडवर पॉर्न पाहा. पॉर्न वेबसाइट पाहताना फोनला फ्लाईट मोडवर टाका आणि वायफायमार्फत सर्फिंग करा.