मृतदेह पाण्याच्या वर का येतो?

मुंबई : अगदी सुईसारखी छोटी वस्तू किंवा छोटासा दगडही पाण्यात टाकला तर तो बुडतो. माणूस जिवंत असताना पाण्यात पडल्यानंतर पोहता येत नसेल तर बुडतो; परंतु मृतदेह बुडत नाही. तो पाण्यावर तरंगतो. असं का होतं, पडला ना प्रश्न? त्याचं उत्तर जाणून घ्यायला हवं… एखाद्याचा मृतदेह पाण्यात टाकल्यानंतर किंवा एखादी व्यक्ती पाण्यात पडल्यानंतर ती काही काळानंतर वर …
 

मुंबई : अगदी सुईसारखी छोटी वस्तू किंवा छोटासा दगडही पाण्यात टाकला तर तो बुडतो. माणूस जिवंत असताना पाण्यात पडल्यानंतर पोहता येत नसेल तर बुडतो; परंतु मृतदेह बुडत नाही. तो पाण्यावर तरंगतो. असं का होतं, पडला ना प्रश्न? त्याचं उत्तर जाणून घ्यायला हवं…

एखाद्याचा मृतदेह पाण्यात टाकल्यानंतर किंवा एखादी व्यक्ती पाण्यात पडल्यानंतर ती काही काळानंतर वर येते. माणसाच्या शरीराच्या वजनापेक्षा कमी वजनाच्या वस्तूही बुडतात. मग मानवी शरीर का तरंगते? किंवा ते काही कालांतराने वर का येते? याचं कारण मृतदेहाचे स्वतःचं एक सूत्र आहे. त्यामुळं तो पाण्यात बुडत नाही. याचं उत्तरं शोधण्यासाठी विज्ञानाचा आधार घ्यावा लागेल. तज्‍ज्ञांनी तीन मुख्य मुद्दे सांगितले आहेत. ते म्हणजे बायोसेन्सी किंवा ब्युएन्सी प्रक्रिया, मृतदेहात असलेल्या टिश्यूमध्ये तयार होणारे अनेक प्रकारचे वायू आणि तिसरा म्हणजे घनता. प्रथम बायोसेन्सी म्हणजेच उत्प्लावन प्रक्रिया समजून घेतली पाहिजे.

ग्रीक शास्त्रज्ञ आर्किमिडीस यांनी जगात सर्वप्रथम उत्प्लावन आणि घनतेच्या सिद्धांताबद्दल सांगितले आहे. या सिद्धांतानुसार कोणतीही वस्तू तोपर्यंत पाण्यावर तरंगू शकते, जोपर्यंत त्याची घनता पाण्यापेक्षा कमी असते. त्यानुसार, मृतदेह काही ठराविक काळासाठी पाण्याखालीही बुडालेला असतो. त्याच तत्त्वानुसार घनता कमी झाली, की मृतदेह स्वतःहून पाण्याच्या वर येतो आणि पाण्यावर तरंगू लागतो. दिल्लीमधील दीनदयाळ उपाध्याय हॉस्पिटलचे फॉरेन्सिक सायन्स विभाग प्रमुख डॉ बी.एन. मिश्रा म्हणतात, की कोणत्याही मृतदेहाच्या पाण्यात किंवा बाहेर राहण्याची संपूर्ण प्रक्रिया फॉरेन्सिक विज्ञानात नमूद केलेल्या दोन-तीन मुद्द्यांवर आधारित आहे. एक म्हणजे मृतदेहाची घनता नेहमीच पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते. मृतदेहाच्या आत वायू तयार होण्याची प्रक्रिया सुरू होताच, मृत शरीराची घनता कमी होऊ लागते आणि त्या तुलनेत पाण्याची घनता वाढू लागते. म्हणूनच मृतदेह पाण्यावर तरंगू लागतो. एखाद्याचा मृत्यू होताच त्याच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे वायू तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते.