महिला पुरुषाच्या प्रोफाईलमध्ये काय शोधतात?

नवी दिल्ली ः बदलत्या जगात ऑनलाइनचं महत्त्व अनन्य साधारण आहे. ऑनलाइन डेटींगचं प्रमाण वाढलं आहे. ऑनलाइन डेटिंग प्रोफाइल तयार करणं, ते टिकवून ठेवणं आणि फसवणुकीपासून दूर राहणं हे ऑनलाइन डेटिंगमध्ये मोठं आव्हान आहे. असं असलं, तरी लोकांना त्यांचे छंद, गुण आणि मनोरंजक माहितीसह स्वत: ला अद्ययावत ठेवण्यास आवडतं. पुरुष आणि स्त्रिया सहसा डेटिंग प्रोफाइलमध्ये भिन्न …
 

नवी दिल्ली ः बदलत्या जगात ऑनलाइनचं महत्त्व अनन्य साधारण आहे. ऑनलाइन डेटींगचं प्रमाण वाढलं आहे. ऑनलाइन डेटिंग प्रोफाइल तयार करणं, ते टिकवून ठेवणं आणि फसवणुकीपासून दूर राहणं हे ऑनलाइन डेटिंगमध्ये मोठं आव्हान आहे. असं असलं, तरी लोकांना त्यांचे छंद, गुण आणि मनोरंजक माहितीसह स्वत: ला अद्ययावत ठेवण्यास आवडतं. पुरुष आणि स्त्रिया सहसा डेटिंग प्रोफाइलमध्ये भिन्न गोष्टी शोधतात. प्रोफाइल मनोरंजक आणि आकर्षक नसल्यास किंवा त्यात काही चूक असेल तर मैत्री करणं टाळलं जातं. एका संशोधनात असं आढळलं आहे, की मुलं प्रोफाईल नीट ठेवण्याबाबत निष्काळजी असतात. प्रोफाइलमध्ये चुकीच्या गोष्टी असल्या,तर मुली निराश होतात. प्रोफाइल फोटो मोठी भूमिका बजावत असतो.

अशा परिस्थितीत प्रोफाईल चित्र जुनं असेल किंवा व्यवस्थित नसेल, तर महिलांचा कमी प्रतिसाद मिळतो. ऑनलाइन डेटिंग दरम्यान बऱ्याचदा तक्रारी येत असतात, की प्रोफाइलमध्ये दिसतं, तसं प्रत्यक्षात नसतं. जेव्हा ऑनलाइन डेटिंगची वेळ येते, तेव्हा स्त्रिया प्रोफाइल चित्रासह आपली मौलिकता तपासतात. प्रोफाइल व्यक्तीमत्त्वाबद्दल बरंच काही सांगून जातं. त्यामुळं नवीनतम माहितीसह प्रोफाइल अद्ययावत करणं आवश्यक असतं. आजच्या काळात बहुतेक लोक परिपूर्ण जोडीदाराच्या शोधात ऑनलाइन व्यासपीठ वापरत असतात. दीर्घकालीन नातेसंबंधासाठी ऑनलाइन डेटिंग वापरत असाल तर आपला बायोडेटा रिकामा ठेवू नका. कारण त्यामुळं इतर व्यक्ती आपल्याशी संपर्क साधू शकणार नाही. माहिती सामायिक करायची नसेल तर आवश्यक तेवढीच माहिती लिहा. प्रोफाइल पिक्चरमध्ये अशा काही गोष्टीही आहेत, ज्या नात्यात येताना महिलांचा मूड ऑफ करू शकतात. लैंगिकसंबंधातील माहिती सामायिक केल्यास प्रतिमा बऱ्याच प्रमाणात खराब करू शकते. प्रोफाइलमध्ये संभाषण सुरू करावं लागतं. अशा परिस्थितीत आपण वापरत असलेले शब्द आपल्या व्यक्तीमत्त्वाला उजाळा देण्याचं काम करतात.