तहसीलदार मागे लागले भाऊच्या! सोशल मीडियावरही ‘पाठलाग’ होतोय गाड्यांचा!! (पहा व्हिडीओ)

बुलडाणा (बुलडाणा लाईव्ह वृत्तसेवा) ः सोशल मीडियावर काय, कसे अन् का बरे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होईल, हिट होईल ते कुणालाच सांगता येणार नाही. मग आपल्यासारख्या सर्वसामान्य नेटकर्यांचे काय? आज 23 जानेवारीच्या मुहूर्तावर सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तीकडून, अज्ञातसमयी प्रदर्शित झालेला व तुफान गाजत असलेला ( अर्थात अज्ञात रेती घाटावरील) व्हिडीओ याचं मजेदार उदाहरण ठरलं आहे. कशासाठी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाईव्ह वृत्तसेवा) ः सोशल मीडियावर काय, कसे अन् का बरे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होईल, हिट होईल ते कुणालाच सांगता येणार नाही. मग आपल्यासारख्या सर्वसामान्य नेटकर्‍यांचे काय? आज 23 जानेवारीच्या मुहूर्तावर सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तीकडून, अज्ञातसमयी प्रदर्शित झालेला व तुफान गाजत असलेला ( अर्थात अज्ञात रेती घाटावरील) व्हिडीओ याचं मजेदार उदाहरण ठरलं आहे.

कशासाठी तर पोटासाठी रेती तस्करीचे पुण्यकर्म (!) करणार्‍या एका ट्रॅक्टरचालकाचा पिच्छा करणारे तहसीलदार साहेब यांच्यावरील हा व्हिडीओ छोटा पॅकेज बडा मजा या धर्तीवरील आहे. सफाईदारपणे रेती घाटाच्या निसरड्या ट्रॅकवर आपले वाहन चालविणार्‍या रेतीचोरट्याचा सायब बी किती जिद्दीने पाठलाग करताहेत हे यात दिसून येते. शेवटी आपली काय खैर नाय यामुळे धास्तावलेला ट्रॅक्टरचालक चक्क नदीच्या खोल पात्रात वाहन टाकतो व सायेब थांबून जातात हा द एन्ड तेवढाच मजेदार ठरलाय. आज शनिवारची सुटी असल्याने कदाचित व्हायरलची गती एकदमच तुफानी ठरली असावी असा तज्ज्ञ नेटकर्‍यांचा अंदाज आहे.