गोल्‍ड लोन मिळते कसे?; काय असते प्रोसिजर

मुंबई : अनेक बँका किंवा वित्त संस्था सहज व कमी व्याजदरात गोल्ड लोन देतात. यासाठी अगदीच कमी कादगपत्रे लागतात. सोन्याची शुद्धता आणि बाजार भाव लोन देताना गृहित धरला जातो.अठरा कॅरेट किंवा त्यापेक्षा जास्त शुद्धतेच्या दागिन्यांवर सहज कर्ज मिळते. गोल्ड लोनसाठी क्रेडिट स्कोअरही बघितला जात नाही. प्रति ग्रॅम सोन्याच्या आधारावर कर्ज मिळते. लोन घेण्याचा हेतूही विचाला …
 
गोल्‍ड लोन मिळते कसे?; काय असते प्रोसिजर

मुंबई : अनेक बँका किंवा वित्त संस्‍था सहज व कमी व्याजदरात गोल्ड लोन देतात. यासाठी अगदीच कमी कादगपत्रे लागतात. सोन्याची शुद्धता आणि बाजार भाव लोन देताना गृहित धरला जातो.
अठरा कॅरेट किंवा त्‍यापेक्षा जास्त शुद्धतेच्या दागिन्यांवर सहज कर्ज मिळते. गोल्‍ड लोनसाठी क्रेडिट स्‍कोअरही बघितला जात नाही. प्रति ग्रॅम सोन्याच्या आधारावर कर्ज मिळते. लोन घेण्याचा हेतूही विचाला जात नाही. गोल्‍ड लोन घेण्यापूर्वी सर्व बँकांचे एकदा व्‍याजदर तपासा. छुपे शुल्क नाहीत ना याचीही विचारणा करून घ्या. प्रीपेमेंट, प्रोसेसिंग फी आणि परतफेड शुल्क आदीबद्दल सविस्‍तर चौकशी करा. दागिन्यांची अदलाबदल आणि इतर धोके याबाबत माहिती घ्या. वेळेवर कर्ज फेडले नाही तर बँक, फायनान्स कंपनीला सोने विकण्याचा अधिकार असतो. तुमच्‍याकडे असलेल्या सोन्यानुसार तुम्‍ही १० हजारापासून १ कोटीपर्यंत कर्ज घेऊ शकता. जेवढी सोन्याची किंमत त्‍याच्‍या ७५ टक्‍क्‍यांपर्यंत लोन मिळते.