ATM मधून रंग लागलेली नोट आली तर काय करायचं?

प्रत्यक्षात व्यवहार करताना खराब नोट आली की लोक ती स्वीकारीत नाही, हा नेहमीचा अनुभव आहे. रंग लागलेल्या नोटेचंही तसंच असतं; परंतु एटीएममधून पैसे काढताना खराब नोट निघाली, रंग लागलेली नोट निघाली, तर काय करायचं असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्याची दाद कुणाकडं मागायची, याची माहिती बहुतांश लोकांना नसते. रंग लागलेली किंवा रंग उडालेली नोट निघाली, …
 

प्रत्यक्षात व्यवहार करताना खराब नोट आली की लोक ती स्वीकारीत नाही, हा नेहमीचा अनुभव आहे. रंग लागलेल्या नोटेचंही तसंच असतं; परंतु एटीएममधून पैसे काढताना खराब नोट निघाली, रंग लागलेली नोट निघाली, तर काय करायचं असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्याची दाद कुणाकडं मागायची, याची माहिती बहुतांश लोकांना नसते. रंग लागलेली किंवा रंग उडालेली नोट निघाली, तर घाबरून जाऊ नका. दाद मागता येते.

खराब नोट निघालेल्या एका ग्राहकानं ट्विटरवर तक्रार केली. त्यानं स्टेट बँकेच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅग केलं. एटीएममधून पैसे काढले, तेव्हा त्यात त्याला रंग लागलेली पाचशे रुपयांची नोट मिळाली. स्टेट बँकेने अशी नोट निघणे शक्य नसल्याचे सांगताना रंग लागलेल्या नोटीचं काय करता येईल,याचं मार्गदर्शन केलं. नोटा एटीएममध्ये लोड करण्यापूर्वी अत्याधुनिक नोट सॉर्टिंग मशीनद्वारे तपासल्या जातात. त्यामुळे रंग लागलेल्या किंवा खराब झालेले नोटा मशीनमध्ये येणे अशक्य आहे. असं झाल्यास कोणत्याही शाखेतून नोट बदलता येते. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार कोणतीही बँक रंगीत नोट स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही. रंग लागलेल्या नोटा, फाटलेल्या किंवा जुन्या नोटा बँकेकडू बदलून मिळतात. जळलेली किंवा खूपच तुकडे- तुकडे झालेली नोट मात्र बँका बदलून देत नाहीत.