औषधे घेताना काय काळजी घ्यावी?; फार्मासिस्ट दीपक नागरे सांगतात…

औषधे हे नेहमी डॉक्टर अन फार्मासिस्टच्या सल्ल्यानेच घेतले पाहिजेत. ज्या दुकानातून औषध घेणार आहात तिथे रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे का नाही हे बघणं गरजेचं आहे. आजही ग्रामीण, निम-शहरी भागात बऱ्याच प्रमाणात मेडिकल वर फार्मासिस्ट नसतात. शहरी भागात ही काही मेडिकल स्टोर वर फार्मासिस्ट नसतात. अशा वेळी आपण त्यांना रजिस्टर्ड नंबर विचारू शकतो. औषध घेताना कोणत्याही बाबी …
 
औषधे घेताना काय काळजी घ्यावी?; फार्मासिस्ट दीपक नागरे सांगतात…

औषधे हे नेहमी डॉक्टर अन फार्मासिस्टच्या सल्ल्यानेच घेतले पाहिजेत. ज्या दुकानातून औषध घेणार आहात तिथे रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे का नाही हे बघणं गरजेचं आहे. आजही ग्रामीण, निम-शहरी भागात बऱ्याच प्रमाणात मेडिकल वर फार्मासिस्ट नसतात.

शहरी भागात ही काही मेडिकल स्टोर वर फार्मासिस्ट नसतात. अशा वेळी आपण त्यांना रजिस्टर्ड नंबर विचारू शकतो. औषध घेताना कोणत्याही बाबी डॉक्टर, फार्मासिस्ट यांच्यापासून लपवू नयेत. जसे की इतर एखादा आजार, इतर कोणते औषध, प्रेग्नन्सी, ऍलर्जी वगैरे. कारण औषध हे इतर बऱ्याच गोष्टींवर परिणाम करू शकते. औषधे हे सांगितलेल्या वेळेनुसार घेतले पाहिजेत कारण प्रत्येक औषधांची काम करण्याची एक पद्धत असते. औषध हे नेहमी लहान मुलांपासून, पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवावेत. डॉक्टर व फार्मासिस्ट ला न विचारता स्वतःच्या मनाने एकमेकांचे औषधे शेअर करू नयेत. उदा. घरात वडिलांना खोकला असला तर तेच औषध मनाने मुलाला देऊ नये कारण औषधांच्या मात्रा, प्रकार ह्या लिंग, वय, पेशंटची सद्यस्तिथी व इतर गोष्टींनुसार बदलत असतात.

औषधे घेताना काय काळजी घ्यावी?; फार्मासिस्ट दीपक नागरे सांगतात…

औषधे घेताना दारू, सिगारेट, गांजा असले कोणतेही व्यवसन करू नये कारण बरेच औषधं हे अल्कोहोल, निकोटिन सोबत रिऍक्ट होऊन काही चुकीचे परिणाम करू शकतात. फेरीवाले, किराणा दुकान, भोंदू बुवा – बाबा यांच्याकडून औषधे घेऊ नयेत. औषध घेताना फार्मासिस्ट कडून बिल घ्यायला विसरू नये व EXPIRY डेट तपासून घ्यावी. गर्भारपणात औषधे हे अत्यंत काळजीपूर्वक व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावीत कारण त्याचा होणाऱ्या बाळावर परिणाम होऊ शकतो. औषधांच्या ठेवायच्या जागा, तापमान विचारून घ्यावे कारण काही औषध जास्त तापमानात खराब होतात, त्यांना फ्रिजिंग ची गरज असते. जास्त औषध घेतले तर लवकर बरे होऊ हा अनेकांचा गैरसमज आहे. त्यामुळे डॉक्टर/फार्मासिस्ट यांनी सुचवली तेवढीच मात्रा घ्यावी. शिवाय वेळ, आहार व इतर पथ्य ही पाळली पाहिजेत. आपल्या डॉक्टर व फार्मासिस्ट चा नंबर आपल्याकडे असावा. औषधांची काही विपरीत रिअक्शन आल्यास ते औषध बंद करून तात्काळ डॉक्टर व फार्मासिस्ट यांच्याशी संपर्क साधावा. औषधे हे गोळ्या-बिस्कीट नाहीत त्यामुळे ते नेहमी काळजीपूर्वक घ्यावेत.
फार्मासिस्ट दीपक नागरे
संपर्क- 7755992556