घरात देवाचे असे फोटो, मूर्ती असेल तर आताच विसर्जित करा!
गरीब असो की श्रीमंत देव्हारा असतोच. मग तो छोटा असेल किंवा मोठा… घरात देव आहेत म्हटल्यावर वातावरणही तसंच प्रसन्न राहतं आणि सकारात्मक ऊर्जा घरात वावरत असते. पण कधी कधी आपल्याकडून चूक होते. आपण चुकीच्या दिशेला किंवा चुकीच्या पद्धतीचे देवदेवतांचे फोटो घरात लावतो. याचे वाईट परिणामही नंतर जाणवू लागतात. त्यामुळे घरात कोणती अन् कशी मूर्ती अथवा फोटो असावा हे जाणून घेणे गरजेचे आहे. अनेक जण घरात श्रीकृष्ण आणि श्रीरामाचे युद्धातील फोटो लावतात. मात्र असे फोटो लावू नयेत. यामुळे घरात सतत अशांतता आणि भांडणाचे वातावरण राहते. वाद होतात. जिथे वाद तिथे लक्ष्मीही वास करत नाही. देवदेवता युद्ध करतानाचे फोटो घरात नसावेत. घरात देवाचे फोटो लावताना सुंदर, हास्य झळकणारे, आशीर्वाद देणारेच फोटो लावावेत. रौद्र रुप असणारे फोटो कधीही लावू नयेत. तुटलेले फोटो किंवा भंगलेली मूर्तीही घरात ठेवू नये. तातडीने विसर्जित करावी. देवाचा चेहरा सहज दिसेल अशी मूर्ती ठेवावी. पाठ तुम्हाला दिसू नये. तशी मूर्ती असेल तर शुभफळ मिळत नाही. मूर्ती अथवा फोटो असा असावा जो पाहताच प्रसन्न वाटावे.