INFO : “तो’, “ती’ अन्‌ ते मेसेज… सारंच तोट्याचं गणित…त्‍यापेक्षा नकोच ते प्रकार!!

सध्या तरुणाईत सेक्सटींग नावाचा शब्द चांगलाच चर्चेत आला आहे. पण सेक्सटींग ही काय भानगड… असं कदाचित काहींना वाटू शकतं. सेक्सटींग म्हणजे कामुक मेसेज पाठवणे, तशी चॅटिंग करणे… आजकालच्या तरुण पिढीच्या प्रेमात, नात्यात ही बाब सर्रास घडते. एव्हाना हे प्रमाण बरंच वाढलंय. पण हे अत्यंत धोकादायक आहे बरं… त्यामुळे यापासून दूरच राहिलेलं बरं… स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा …
 
INFO : “तो’, “ती’ अन्‌ ते मेसेज… सारंच तोट्याचं गणित…त्‍यापेक्षा नकोच ते प्रकार!!

सध्या तरुणाईत सेक्‍सटींग नावाचा शब्‍द चांगलाच चर्चेत आला आहे. पण सेक्सटींग ही काय भानगड… असं कदाचित काहींना वाटू शकतं. सेक्सटींग म्‍हणजे कामुक मेसेज पाठवणे, तशी चॅटिंग करणे… आजकालच्‍या तरुण पिढीच्‍या प्रेमात, नात्‍यात ही बाब सर्रास घडते. एव्‍हाना हे प्रमाण बरंच वाढलंय. पण हे अत्‍यंत धोकादायक आहे बरं… त्‍यामुळे यापासून दूरच राहिलेलं बरं…

स्‍मार्टफोन, लॅपटॉप किंवा कॉम्‍प्‍युटरवरून एकमेकांना केले जाणारे सेक्स मेसेजेस, फोटो किंवा व्हिडिओ शेअरिंग म्‍हणजेच सेक्‍सटींग… सेक्‍स आणि टेक्‍स्‍ट मिळून हा शब्‍द तयार झालेला आहे. अशा प्रकारच्या चॅटिंगच्या माध्यमातून जोडपे एकमेकांशी मोकळेपणाने बोलू लागले आहेत. मात्र याचे अनेक तोटे समोर येत आहेत. शाळा, कॉलेजेसमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम त्‍यांच्‍या भविष्यावर होत आहे. हे करत असताना चुकून कुणाच्‍या हाती फोन गेला तर बिकट परिस्‍थिती निर्माण होऊ शकते. घरच्‍यांना कळलं तर गंभीर परिणामही भोगावे लागू शकतात.

अनेकदा या माध्यमातून खोटेपणा सर्रास चालतो. त्‍यामुळे फसवणूकही होण्याची शक्‍यता असते. एकदा हे सेक्सटींग भूत मानगुटीवर बसलं की व्यसन लागल्यासारखे अनेक जण आहारी जातात. त्‍यामुळे जोडीदाराच्‍या मनातही गैरसमज निर्माण होऊ शकतो. अनेकदा अशा मेसेजेसमध्ये नको ते खासगी फोटो पाठवले जातात आणि समोरची व्‍यक्‍ती ते फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलही करू शकते. त्‍यामुळे अशा प्रकारच्‍या संवादात फोटो, व्हिडिओ शेअर करणे टाळाच. काही जोडपे व्हिडिओ कॉल करतात, मात्र सध्या अनेक स्मार्टफोनमध्ये स्‍क्रीन रेकॉर्डरची सुविधा आहे. त्‍यामुळे तुमचा हा व्हिडिओ कॉल रेकॉर्डही होतो आणि त्‍या व्हिडिओचा गैरवापरही होऊ शकतो.