बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): NEET आणि JEE सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांवर मोठा ताण येतो. अभ्यासाच्या या दडपणातून विद्यार्थ्यांना थोडा विरंगुळा मिळावा यासाठी करिअर पॉईंट बुलडाणा संस्थेच्या वतीने ‘फन-डे’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम आज सुट्टीच्या दिवशी सकाळी ७ ते १० या वेळेत खामगांव रोडवरील डोंगरे टर्फ येथे पार पडला.
या उपक्रमात क्रिकेटसह विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. खेळांमध्ये विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षक वृंदांचाही सहभाग होता. यांनी विद्यार्थ्यांसोबत खेळत उत्साहवर्धक वातावरण तयार केले.
Related img.
खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, सहकार्य, शिस्त आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित झाली. याचा सकारात्मक परिणाम अभ्यासावर होतो, असे शिक्षकांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
“फन-डेमुळे थोडी ताजेतवाने वाटले, तयारीच्या ताणातून बाहेर पडलो,” असे एका NEET विद्यार्थ्याने सांगितले. दुसऱ्याने “अशा उपक्रमांची गरज होती, पुन्हा असा दिवस यावा,” अशी प्रतिक्रिया दिली.
Related img.
पालक आणि शिक्षकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले असून, यामुळे विद्यार्थी तणावमुक्त होऊन अभ्यासाकडे अधिक लक्ष देतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.