१२ वीचा आज निकाल; "एक रिझल्ट आयुष्य ठरवत नाही", काहींसाठी आनंद, काहींसाठी धक्का... पण थांबू नका! आशावादी रहा! इथे पहा निकाल....एका क्लिकवर

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इ. १२ वी परीक्षेचा निकाल आज, सोमवार, ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली आहे.
 
12 result banner
Related img.
परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होईल:
Digilocker App मध्ये डिजिटल गुणपत्रिका सहज उपलब्ध होणार असून, कनिष्ठ महाविद्यालयांना mahahsscboard.in (college login) या संकेतस्थळावर एकत्रित निकाल मिळेल.
बुलढाणा लाइव्ह परिवाराच्या वतीने परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक…! आजचा दिवस फक्त निकालाचा नाही, तर नव्या स्वप्नांना दिशा देणारा ठरेल!