

कोणं म्हणतयं बुलढाण्यात राहून NEET /JEE करता येत नाही? बुलढाण्याच्या करिअर पॉईंट्स ने घडवले ५० हून अधिक डॉक्टर अन् बरंच काही! २ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला प्रवास प्रवेशासाठी रांगा लागेपर्यंत...
Updated: Mar 26, 2025, 12:23 IST
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):–"प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे.." अशी मराठीत एक म्हण आहे. याचाच अर्थ जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी कोणतीही कठीण गोष्ट सहज साध्य करता येते. या म्हणीचा खरा खुरा प्रत्यय येतो तो बुलडाण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या "करिअर पॉईंटची" वाटचाल पाहिल्यावर.. "छे छे बुलढाण्यात राहून कुठं डॉक्टर होता येतेय का? त्यासाठी तर लातूर, कोटा इकडच जावं लागतंय.." असा सर्वदूर पसरलेला आणि पसरवलेला समज खऱ्या अर्थाने "गैरसमजच" असल्याचं करिअर पॉईंट न दाखवून दिलं.. कोरोना काळात कोट्याहून परतलेल्या २ विद्यार्थ्यांपासून सुरू केलेला हा प्रवास आता शेकडो विद्यार्थ्यांपर्यंत येऊन पोहोचलाय..५ वर्ष, ३ निकाल आणि ५० हून अधिक डॉक्टर..त्यातही १६ विद्यार्थी एमबीबीएस...! बुलडाण्यासारख्या शहरात करिअर पॉईंटची ही दमदार अन् गौरवशाली वाटचाल म्हणजे "या जगात अशक्य असं काहींच नसतं" हेच दर्शवणारी आहे.
पवार सायन्स क्लासेसच्या माध्यमातून बुलडाण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात सुपरिचित श्री. विजय पवार सरांची ही संकल्पना. स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्यांचे स्वप्न पूर्ण करून घेण्यासाठी पाल्य आणि पालक दोघेही धडपडत असतात. NEET, JEE सारख्या कठीण परीक्षांची तयारी करायची म्हणजे लातूर, कोटा येथील महागडे क्लासेस, राहण्याचा , खाण्याचा प्रचंड खर्च....मात्र प्रत्येक सर्वसामान्याला हे परवडेलच असे नाही..हिच भावना अनेक पालकांनी श्री.विजय पवार सरांकडे बोलून दाखवली. यातूनच २०२० ला मुहूर्तमेढ रोवल्या गेली ती करिअर पॉईंटची.. तो काळ होता कोरोनाचा..२ विद्यार्थ्यांच्या प्रवेशापासून सुरू झालेला हा प्रवास आता प्रवेशासाठी रांगा लागेपर्यंतचा आहे...मात्र त्यासाठी घेतलेली प्रचंड आणि सातत्यपूर्ण मेहनत, करिअर पॉईंटच्या प्राध्यापकांसह सर्वच स्टाफने झोकून देऊन केलेले काम या बाबी तेवढ्याच महत्वाच्या आहेत.."करिअर पॉईंट कोटा" या नामांकित क्लासेसची शाखा बुलढाण्यात सुरू झाल्याने शेकडो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना धुमारे फुटले आहेत..अगदी मजुरी करणाऱ्या कष्टकरी बापाचा मुलगा देखील आपल्या बुलढाण्यात शिकून NEET चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकतो, डॉक्टर होऊ शकतो हा विश्वास बुलढाण्याच्या करिअर पॉईंट ने दिला आहे.
वेगळेपण जपलं
एकीकडे अनेक क्लासेस, स्पर्धा, आश्वासनांची खैरात असं सगळं काही सुरू असताना करिअर पॉईंटने मात्र आपलं वेगळेपण जपलं आहे. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे एमबीबीएसचे (शासकीय) महाविद्यालयाचे प्रथम वर्षाचे प्रवेश शुल्क श्री.विजय पवार सरांनी स्वतः भरले आहे.त्यापैकी दोन विद्यार्थ्यांच्या एमबीबीएसच्या पूर्ण शिक्षणाचा भार देखील त्यांनी उचलला आहे. आतापर्यंतच्या ३ बॅचेस मिळून ५० पेक्षा अधिक विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये १६ विद्यार्थी एमबीबीएस, २० बीएएमएस, १० बीएचएमएस,१० बीडीएस विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पॅरामेडिकल क्षेत्रात गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय JEE MAINS चा रिझल्ट देखील वाखाण्याजोगा आहे.
पालक म्हणतात....
हल्ली लातूर,कोटा, छत्रपती संभाजीनगर इथे मुलांना पाठवणे म्हणजे प्रचंड खर्चिक काम आहे. याशिवाय घरच्या जेवणाअभावी मुलांचे तिकडे काय हाल होतात हे पालकांना वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याशिवाय वाढती गुन्हेगारी सुद्धा मुलांसाठी अडचणीची ठरते. त्यामुळे बुलढाण्यात राहुन, घरचे ,आईच्या हातचे जेवून आणि आणि दररोज पालकांच्या डोळ्यासमोर राहून जर सगळ काही साध्य करता येत असेल तर कशाला NEET/JEE साठी बाहेर जायचं? म्हणूनच तर आपलं करिअर पॉईंट ठरतंय फायद्याचं