SPOT REPORT! "कर्तव्यदीप" विझला;दीपकच्या वीरमरणाने शोक सागरात बुडाले पळसखेड नागो! पत्नीशी बोलताना चा कॉल ठरला शेवटचा!

वर्षभरापूर्वी झाले होते लग्न;घराचे बांधकामही अर्धवट राहिले! बातमी वाचून डोळ्यात पाणी येईल...
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्हा मुख्यालयाच्या शहरापासून पश्चिमेकडे १० किमी अंतरावर असलेल्या पळसखेड नागो गावात आज चुल देखील पेटली नाही. बंजारा लोकवस्तीशी नातं सांगणार हे गाव आपला सुपुत्र, सवंगडी देशसेमेवर कर्तव्य बजातांना वीरमरण आल्याने आपल्याला सोडून गेल्याची वार्ता कळताच गाव शोक सागरात बुडाले आहे. आपला दोस्त, सखा , बंधू कर्तव्यपथावर वीरगती प्राप्त झाल्याने "एका नयनी अश्रू एका अभिमान" अशी अवस्था आज पळसखेड नागो मध्ये पाहायला मिळाली. 

२२ तारखेला ही घटना रात्री जेव्हा घडली; तेव्हा दीपक हे आपल्या पत्नीशीच बोलत होते. पत्नीशी बोलतानाचा तो कॉल त्यांच्या कुटुंबीयांसाठी शेवटचा ठरला. दीपक यांच्या पत्नी अश्विनी यादेखील मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. 

 

 

दिवाकर आणि पुष्पा या शेतमजूर दांपत्याच्या पोटी जन्माला आलेला दीपक अत्यंत मेहनती मुलगा. तीन भाऊ आणि एक बहीण आणि मेहनतीने काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करणारे आई-वडील असं हे कुटुंब. गावातच असलेल्या आश्रम शाळेत त्याने प्राथमिक शिक्षण घेतले. वडील शेतमजुरी करतात आणि आई पुष्पा त्याच शाळेत अगदी वर्षभरापूर्वीपर्यंत पोळ्या लाटण्याचं काम रोजंदारीवर करत होत्या. मोठा भाऊ महेंद्र हे आजही शेतमजुरी करतात तर लहान भाऊ असलेल्या शुभमच्या शिक्षणाची जबाबदारी ही देखील दीपक वरच होती. बहिण करुणा या विवाहित असून आपला भाऊ देशसेवेत कामी आल्याने त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीयेत. गावातल्या निवासी आश्रम शाळेसमोरच त्याचं छोटसं असलेल्या छपराच्या आणि टीनाच्या घराचं आता कुठे त्याने स्लॅबच्या घरात रूपांतर केलं होतं.
Hdjc
Related img.

 

दीपक हा बनसोडे कुटुंबीयांचा मोठा आधार होता. आता तो नाही हे मान्यच करायला कुटुंब, गावकरी तयार नाहीत. काल- परवा पर्यंत आमच्याशी बोलणारा दीपक असा कसा काय आम्हाला सोडून जाऊ शकतो असं बोलताना त्याचा मित्र प्रवीण भराड आणि आकाश मानकर यांचे डोळे पाणावले होते.
  दीपक बनसोडे हे २०१९ मध्ये १२ महार बटालियनमध्ये देशसेवेत रुजू झाले होते. मजुरी करून कष्ट उपसणाऱ्या बनसोडे कुटुंबीयांना तीन मुलं,एक मुलगी. दीपक हा मधवा. तो नोकरीत रुजू झाल्याने त्याचे लग्न वडिलांनी मागच्या वर्षी लावून दिलं. सगळ्यांशी मनमोकळेपणानं आपुलकीने गावात वागणारा असल्याने दीपकचा मोठा आप्त वर्ग गावात आहे. दीपक हा कर्तव्यावर असताना त्याच्या जाण्याची वार्ता गावात कळताच वृद्ध आई-वडिलांचा आजचा आक्रोश हा कुठल्याही संवेदनशील मनाला चटका लावून जाणारा आहे. आपल्या आयुष्यभराचा साथी असा अर्ध्यावरती डाव मोडून गेल्याने दीपक यांच्या पत्नी यांचा विलाप काळीज चिरणारा होता. त्यांचा दुःखावेग आवरताना नातेवाईकही काळजीत पडले आहेत. तब्येत बिघडल्याने अश्विनी यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. मुंबईवरून त्या आज पहाटेच्या सुमारास पळसखेड नागो येथे पोहोचल्या होत्या.
Hhvh
Related img.
गावातला अबालवृद्ध हळहळला आहे. सवंगडी अंत्यसंस्काराच्या तयारीत गुंतले आहेत. बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कांबळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ऍड संजय राठोड, महसूल विभागाचे अधिकारी ,ग्रामसेवक यांनी गावात भेट देऊन अंत्यसंस्काराच्या तयारीची माहिती घेतली आहे.
उद्या बुधवारी निघणार अंतयात्रा..
दीपक यांचे पार्थिव आज मुंबईतून छत्रपती संभाजीनगर येथे विमानाने पोहोचेल. त्यानंतर ते रस्ता मार्गे बुलडाणा येथे रात्री उशिरा येणार आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी आठ वाजता धाड नाका मार्गे अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. दे.घाट, दत्तपुर येथे श्रद्धांजली वाहण्यात येईल. त्यानंतर दहाच्या सुमारास गावात पोहोचल्यावर दीपक यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती पळसखेड नागो येथील भूपेश जाधव व विठ्ठल राठोड यांनी दिली...
कर्तव्याला दिले कायम प्राधान्य..
Cnncj
Related img.
दीपक २०१९ मध्ये महार बटालियनमध्ये रुजू झाले. त्यानंतर २०२३ मध्ये त्यांचा विवाह ठरला. ११ मे २०२३ रोजी दीपक यांचा विवाह अश्विनी यांच्याशी झाला. कर्तव्याला कायम प्राधान्य देणारे दीपक नानमुखाच्या दिवशी देखील घरी उपस्थित नव्हता. कर्तव्यावरून थेट लग्नाच्या दिवशीच तो गावात पोहोचला होता. दीपक हा लहानपणापासूनच अत्यंत कष्टाळू मुलगा होता. आमच्या शाळेचा विद्यार्थी असल्याने त्याचा अभिमानाचा असल्याचे माधव तायडे म्हणाले.