'स्किन हेल्थचा जागर': बुलढाण्यात 13 जुलै रोजी मोफत त्वचारोग तपासणी शिबिर..IADVL च्या विक्रमी मोहिमेत 'आंबेकर स्किन क्लिनिक' सहभागी
Jul 12, 2025, 11:23 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) –शहरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक आणि आरोग्यदायी संधी! आंबेकर स्किन क्लिनिक, बुलढाणा व भारतीय त्वचारोग संघटना (IADVL) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक 13 जुलै 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मोफत त्वचारोग तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर आंबेकर स्किन आणि श्रीशा डेंटल क्लिनिक, बस स्टँड जवळ, राणा गेस्ट हाऊसच्या बाजूला, बुलढाणा येथे आयोजित केले जाईल.
या शिबिरात खालील आजारांवर मोफत तपासणी आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे –
- ✅ मुरुम, पुरळ
- ✅ खाज, एलर्जी
- ✅ त्वचा काळसर होणे, डाग
- ✅ पांढरे डाग (व्हिटिलिगो)
- ✅ सोरायसिस
- ✅ फंगल इन्फेक्शन (नायटा)
- ✅ केसगळती, टक्कल
- ✅ कोंडा, खाज
- ✅ नखांचे विकार
- ✅ चेहऱ्यावरील व्रण आणि इतर त्वचा विकार
या शिबिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे – भारतीय त्वचारोग संघटना (IADVL) यांच्यामार्फत संपूर्ण भारतभर एकाच दिवशी तब्बल 550 शिबिरे घेण्यात येत असून हा उपक्रम वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदविण्यात येणार आहे. बुलढाण्यातील हे शिबिर त्याच ऐतिहासिक उपक्रमाचा भाग आहे.
त्वचारोगतज्ज्ञ डॉ. प्रज्वल आंबेकर, ज्यांच्याकडून नागरिकांना सल्ला व तपासणी मिळणार आहे. शिबिर सर्वांसाठी खुलं असून नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीच्या अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करा: 8080334900
त्वचा, केस व नखांचे विकार यासाठी उपचाराची ही सुवर्णसंधी नक्कीच दवडू नका.