अभिमानास्पद बातमी! "नांदुरा तालुक्यातील काटी येथील नेहा जुनारे देशपांडे बनविणार भारतीय सैनिकांसाठी स्वदेशी बुलेट प्रुफ जॅकेट."

 
नांदुरा(
नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नांदुरा तालुक्यातील काटी ह्या छोट्याशा गावातील प्रा.शंकर ओंकार जुनारे यांची कन्या नेहा जुनारे देशपांडे यांनी मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्याचे नाव गुजरात राज्यात नावलौकीक करीत नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी गांधीनगर (गुजरात) येथून अभियांत्रिकी आणि बॅलिस्टिक सामग्रीच्या आंतरविद्याशाखीय शाखेत राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या विषयात बुलेटप्रूफ जॅकेट विकसित करून पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. भविष्यात भारतीय सैनिकांसाठी स्वदेशी बुलेट प्रुफ जॅकेट बनविण्याचे नेहाचे स्वप्न आहे.
     
  नेहाने विस्तृत संशोधन करीत थ्री-डी विणलेल्या कापडांचा वापर करून नवीन सॉफ्ट आर्मर्ड सामग्री विकसित केली आहे. ही नवीन चिलखती सामग्री तांत्रिक वस्त्रक्षेत्राच्या उच्च कार्यक्षमतेच्या धाग्यापासून बनलेलीआहे, ज्याचा उपयोग लष्कर, पोलीस आणि इतर सुरक्षा संस्थां सारख्या विविध सुरक्षा संस्थांद्वारे केला जाऊ शकतो. तीने याआधीच तीच्या संशोधन आणि नवोपक्रमासाठी पेटंटसाठी अर्ज दाखल केलाआहे.
  नेहाने थ्री-डी ने विणलेल्या कंपोझिट टेक्सटाईल मटेरियल्सच्या अनुक्रमितस्तरांचा वापर करून बॅलिस्टिक संरक्षण सामग्रीचे मूल्यांकन आणि सुधारणा या शीर्षकाखाली संशोधन केले असून नेहाने एनएफएसयू मधील प्राध्यापक प्रा. डॉ. मेरूल वकील यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले आहे. तिला तिच्या सहमार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. पूजा आहुजा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. नेहाने गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून पदवी आणि पदव्युत्तर अभियांत्रिकी या दोन्हीमध्ये प्रथम गुणवत्ता रँकधारक आणि सुवर्णपदक विजेती आहे. ती सध्या श्रीमती नेहा, अरविंद कंपोझिट लिमिटेड अहमदाबाद, गुजरात येथे व्यवस्थापक, संशोधन आणि विकास म्हणून कार्यरत आहे. 
   नेहाने तांत्रिक वस्त्रोद्योग अभियंता आहेत ज्यांना संमिश्र साहित्य निर्मिती, संशोधन आणि विकास या क्षेत्रात ६ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. नेहाने राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या विषयात बुलेटप्रूफ जॅकेट विकसित करून पीएचडी पदवी पूर्ण करुन अतुलनीय कामगिरी केली आहे. हा महाराष्ट्र राज्य आणि विशेषतः बुलडाणा जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.