अभिमानास्पद..!!तांदुळवाडीच्या लेकीचा दिल्लीत झेंडा! अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नम्रता रिंढेंच्या पुस्तकाचे प्रकाशन....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच दिल्लीत पार पडले. या संमेलनात बुलढाणा तालुक्यातील तांदुळवाडी गावातील युवा लेखिका कु. नम्रता रिंढे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. विधान परिषदेच्या उपसभापती तसेच साहित्यिक डॉ. निलम गोऱ्हे यांच्या हस्ते "सातपुड्यातील आदिवासी लोकजीवन" या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकात नम्रता रेंडे यांनी सातपुड्यातील आदिवासी जीवनशैली अधोरेखित केली आहे. तांदुळवाडी सारख्या ग्रामीण भागातून सकस साहित्य निर्मिती करण्याचा प्रयत्न नम्रता रिंढे यांनी केला असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे..
कु. नम्रता रिंढे यांच्या "मुलगी म्हणून जगताना" या पुस्तकाचे प्रकाशन देखील ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात झालेले होते हे विशेष. तांदुळवाडी सारख्या छोट्याशा गावातून साहित्य निर्मिती करणाऱ्या नम्रता रिंढे बुलढाणा जिल्ह्याचा नावलौकिक वाढवत आहेत हे नक्कीच. नम्रताला आजोबा दलित मित्र भुजंगराव रिंढे पाटील, आजी चंद्रकला रिंढे, वडील आबाराव रिंढे, आई संगीता रिंढे, काका राजेश रिंढे आणि काकू वंदना रिंढे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते..