पंतप्रधान नरेंद्र मोदी या भाजीची पावडर खाऊन राहतात फिट! प्रोटीनचा बाप आहे ही भाजी.... लोखंडासारखी फुगते छाती, सांधेदुखी होते गायब....

 
  बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा:- पोलादी छाती बनवण्यासाठी आणि स्नायु बळकट करण्यासाठी भारतामध्ये अनेक जण प्रोटीन पावडरचे सेवन करतात.. त्यासाठी महागड्या जिम देखील तरुणांकडून लावल्या जातात. बॉडी बिल्डिंग साठी मोठा खर्च देखील या प्रोटीन पावडर वर केल्या जातो.. मात्र भारतात अशा अनेक नैसर्गिक भाज्या आहेत जामध्ये प्रोटीन ठासून भरलं आहे. विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील एक नैसर्गिक भाजी फेवरेट असून..त्या भाजीचे पराठे नरेंद्र मोदी यांना खूप आवडतात..
 
 
   सध्या वजन कमी करण्यासाठी सगळेजण धावपळ करतात. त्यासाठी लाखो रुपये खर्च करतात.. वजन कमी करण्याची इच्छा असलेले जीम, डायट प्लॅन, योगा यासारख्या विविध उपायांचा अवलंब करतात. मात्र एक अतिशय साधा आणि नैसर्गिक उपाय देखील वजन कमी करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडू शकतो. त्याचे नाव आहे "मोरिंगा पावडर" म्हणजेच शेवग्याच्या शेंगांची पावडर.ही पावडर फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवडते पराठे बनवण्यापुरते मर्यादित नसून ही पावडर वजन कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे...
  
   शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजे "देशी फॅट कटर" म्हणून ओळखली जाते. दक्षिण भारतात शेवगा अतिशय लोकप्रिय भाजी आहे. शेवग्याच्या शेंगा, पाने, फुले ही सर्वच अंगे अतिशय उपयुक्त आहे. फुफ्फुस,हृदय, यकृत, मूत्रपिंडाच्या आजारांवर देखील ही भाजी रामबाण उपाय आहे. ज्या महिला शेवग्याची भाजी खातात त्या महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता देखील अतिशय कमी असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील शेवग्याच्या शेंगांची भाजी, शेवग्याच्या पानांचे पराठे खूप आवडतात.. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत याबद्दलची माहिती दिली होती.
शेवग्याच्या शेंगांची पावडर पोषण मूल्यांनी अतिशय समृद्ध आहे. त्यात आयरन, कॅल्शियम, प्रोटीन, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि, विटामिन ए.बी. सी आणि के यासारखे आवश्यक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. शेवग्याच्या शेंगांची पावडर नियमितपणे सेवन केल्यास शरीरातील अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत होते...