चला अयोध्येला जाऊ..!मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेंतर्गत अयोध्या दर्शनाचे नियोजन;बुलडाणा जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांन "हे" काम आधी करा...

 
 
        बुलडाणा, (जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८०० जेष्ठ नागरिकांना श्रीराम मंदिर अयोध्या(उत्तरप्रदेश) या तिर्थस्थळी ने-आण करण्यासाठी दि. ७ ते ११ मार्च २०२५ या कालावधीत नियोजन करण्यात आले आहे. या तिर्थस्थळ दर्शनाकरीता पात्र असलेल्या जेष्ठ नागरिकांनी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव रामसिंग चव्हाण यांनी केले आहे.
           
             श्रीराम मंदिर अयोध्या तिर्थस्थळी जाणाऱ्या पात्रताधारक जेष्ठ नागरिकांनी सामान्य रुग्णालय तसेच तालुकास्तरावरील आरोग्य यंत्रणाकडून वैद्यकीय तपासणी करुन त्याबाबतचे प्रमाणपत्र समाजकल्याण कार्यालयाकडे सादर करावे. तसेच प्रवासाकरीता जाण्याची तारीख व वेळ लाभार्थ्यांना यथावकाश दुरध्वनीव्दारे कळविण्यात येईल, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाव्दारे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.