"मै चिराग हू तुम्हारे घर का... जलना मेरा जरुरी है...!" वीर जवान दीपक बनसोडे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

विराट जनसागर लोटला; गहिवरली अवघी पंचक्रोशी! अमर रहे अमर रहे , भारत माता की जय च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला..
 
Djdjf
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):;रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या फुलांच्या रांगोळ्या, "अमर रहे ..अमर रहे .. वंदे मातरम..भारत माता की जय" या घोषात वीरमरण आलेले जिल्ह्याचे सुपुत्र दीपक बनसोडे यांच्यावर आज मूळ गावी पळसखेड नागो येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या गावचा सुपुत्र दीपक बनसोडे याला वीरमरण आल्यानंतर गेल्या दोन दिवसात पळसखेड नागो शोकसागरात बुडाले होते. डोळ्यात आसवांच्या धारा लागलेल्या अन् अवघी पंचक्रोशी गहिवरल्याचे दिसून आले. 
बुलडाणा
Related img.

 

जम्मू कश्मीर मधील कोपवाडा भागात कर्तव्यावर असताना दीपक बनसोडे यांना वीरमरण आले. २२ सप्टेंबरला ही घटना घडली. त्यानंतर २४ सप्टेंबरला रात्री मुंबईवरून दीपक यांचे पार्थिव बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उशिरा आणण्यात आले. आज सकाळी ८ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयातून जवान दीपक यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली.
Hii
Related img.

 

समोर मोटार सायकल रॅली काढण्यात आली. बिरसिंगपूर,देऊळघाट, दहिद फाट्यावर वीर जवान दिपक बनसोडे यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर साडेअकरा वाजेच्या सुमारास पार्थिव बनसोडे कुटुंबियांच्या घरी आणण्यात आले. यावेळी वीर पत्नी, वीर माता - पिता यांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. दिपक बनसोडे यांचे पार्थिव नियोजित अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आणण्यात आणल्यानंतर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील, एसपी विश्व पानसरे,अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांनीदेखील पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. त्यानंतर सैन्यदलाच्या वतीने हवेत तीन फैरी तर बुलडाणा जिल्हा पोलिसदलाच्या वतीने हवेत ५ फैरी झाडण्यात आल्या. त्रिशरण, पंचशील झाल्यानंतर दिपक यांच्या मोठ्या भावाने पार्थिवाला अग्नी दिला..
Hii
Related img.
 कर्तव्यदीप निमाला. "भारत माता की जय "चा जयघोष झाला.....
 
   दीपक यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आल्यानंतर निघणाऱ्या ज्वाला देखील देशसेवेची हाक देऊनच गेल्या असतील. त्या ज्वाला देखील यावेळी जणू म्हणत असतील..
"सर फिरी हवाओ का.. सर कुचलना जरुरी है.....मै चिराग हू तुम्हारे घर का.. मेरा जलना जरुरी है.."
वीर पत्नीचा आक्रोश...
वीर
Related img.
  सैन्य दलात पती आणि वीर पत्नी आश्र्वूनी स्वतः मुंबई पोलीस दलात कार्यरत. दोघेही देश सेवेसाठी आपले योगदान देत होते. गरिबीचे चटके सहन करता करता आता कुठे चांगले दिवस या कुटुंबाला आले होते. टीन पत्राच्या घरातून दीपक ने स्लॅबच्या घराकडे आपल्या कुटुंबाला नेले. लहान भावाच्या शिक्षणाची जबाबदारी देखील उचलली. मोल मुजरी करणारे आई -वडील सुखाचे दोन घास आपल्या कुटुंबासह खात होते. परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते.
Hii
Related img.

 

जम्मू कश्मीर भागात दीपक कर्तव्यावर होते. २२ सप्टेंबरला ही घटना होत असताना दिपक आपल्या मुंबई येथे कार्यरत पत्नीशी फोनवर बोलत होते. फोन सुरू असतांनाच दिपक यांच्यावर काळ कोसळला. तेच त्यांच्या दोघांमधील शेवटचे बोलणे ठरले. ते दोघेही २४ तारखेला घरी म्हणजेच पळसखेड नागो येथे येणार होते. तर आज अश्विनी आणि दीपक यांची भेट नियतीने अशी घडवून आणली. सुखी संसाराची रंगवलेली सगळी स्वप्नं विरली. आपल्या पतीचे तिरंग्यात सामावलेले पार्थिव पाहिल्यानंतर अश्विनी यांचा आक्रोश काळीज चिरणारा होता. यावेळी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत, जयश्री शेळके, संजय राठोड, संदीप शेळके, कुणाल गायकवाड, शर्वरी तुपकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व विराट असा जनसागर उपस्थित होता..