आज घराघरात गणपती बाप्पाचे आगमन! बाप्पाच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त केव्हा? जाणून घ्या शास्त्रोक्त विधी...

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भक्तांवर कृपा करणारा, भक्तांचे दुःख हरण करणारा बाप्पा अर्थात भगवान श्री गणेशाचे आगमन आज,७ सप्टेंबरला घराघरात होणार आहे. देशभरात बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष सुरू आहे. १० दिवस देशभरात हा उत्सव सुरू राहणार आहे. गणपती बाप्पाच्या स्थापनेची विधिवत माहिती, शुभ मुहूर्त आपण जाणून घेणार आहोत..

पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यंदा चतुर्थी तिथी ६ सप्टेंबरच्या म्हणजेच शुक्रवारच्या दुपारी १२.८ मिनिटांनी सुरू झालेली आहे. आज ,७ सप्टेंबरच्या सायंकाळी ७ वाजेपर्यंत चतुर्थी तिथी असणार आहे.
  तिथीनुसार आज,७ सप्टेंबरला गणेश चतुर्थीचे व्रत करणे शुभ आहे. भगवान श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी सकाळी ११.३ वाजेपासून तर दुपारी १.३४ वाजेपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे. या दरम्यान श्री गणेशाची स्थापना करणे फलदायी ठरेल.
याशिवाय सकाळी ७ .३६ ते ९.१० आणि दुपारी १.५३ ते ३.२७ हा देखील गणेशाच्या स्थापनेसाठी शुभ मुहूर्त आहे..