DIWALI SPECIAL यही जुनून यही एक खाब मेरा है, वहा चिराग जलादू जहाँ अंधेरा है! हजारोंच्या आयुष्यात श्वेता ताईंनी पेटवला आरोग्याचा दिप! अनेकांचे आयुष्य प्रकाशमान....
Oct 31, 2024, 20:34 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राजकारणाचे संदर्भ दिवसेंदिवस बदलत चालले आहेत. लोकसंख्या वाढत आहे. मरणदारी- तोरणदारी लोकप्रतिनिधींनी पोहोचलेच पाहिजे हा सामाजिक अट्टाहासही यातून सुटलेला नाही. त्यात सातत्याने असलेली धावपळ , विधानमंडळातल्या कामगिरीसाठी महानगराकडे घ्यावी लागणारी धाव आणि तेथून ग्रामीण भागातल्या कानाकोपऱ्यात पोहोचताना श्वेताताई महाले यांनी गेल्या ५ वर्षात सर्वसामान्यांशी चांगलाच समन्वय साधला.लोकप्रतिनिधीचे सर्व कार्य पार पाडत असताना ज्या कुटुंबात आजाराने ग्रासलेले सदस्य आहेत, त्यांच्या आयुष्यात आरोग्य दिवाळी साजरी करण्यासाठी हक्काची ताई असलेल्या श्वेताताई महाले यांनी रक्षाबंधन आणि भाऊबीजेचे एक प्रकारे "रिटर्न गिफ्ट"च शेकडो भावांना -माय माऊल्यांना दिले आहे...
"तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्यूर्मा अमृत गमय".. अर्थात असत्याकडून सत्याकडे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे जात असताना मृत्यूपासून जीवनाकडे वाटचाल करण्याचे एक प्रकारचे ध्येय.चिखली विधानसभा मतदारसंघातच नव्हे जिल्हाभरात मोठ्या आजारांनी , दुर्धर व्याधींनी ग्रासलेल्या रुग्णांना जीवनदान देण्यासाठी मोठ्या इस्पितळात त्यांचे उपचार मोफत करून आणण्याचे सेवाकार्य आमदार श्वेता महाले यांनी विविध यंत्रणांच्या समन्वयद्वारे घडवून आणले आहे. ज्या कुटुंबांमध्ये अशी दुर्धर आजार झालेले व्यक्ती असतात त्यांची मोठी वाहतात होते. मोठ्या नगरांमध्ये जाऊन मोठ्या दवाखान्यात जाऊन उपचार घेणे या कुटुंबांसाठी परवडणारे नसते. त्यात नैराश्य येते आणि पूर्ण कुटुंबच मग हवालदिल होऊन जाते. मात्र आमदार श्वेता ताई महाले यांनी
"यही जुनून यही एक खाब मेरा है! वहा चिराग जलादू जहाँ अंधेरा है.."
या ओळींप्रमाणे अंधकारमय जीवनाकडे जाणाऱ्या या कुटुंबांच्या आयुष्यात आरोग्याचा दीप पेटवला आहे. एक प्रकारे आरोग्य दिवाळी साजरी करत त्यांच्या आयुष्यात आनंदरुपी प्रकाश करण्याचं काम श्वेताताईंनी केल आहे. जवळपास ३० कोटी रुपयांची आरोग्य मदत श्वेताताईंनी हजारो रुग्णांना मिळवून दिली आहे...
श्वेताताईंच्या मदतीमुळेच चालू शकलो...
सातगाव म्हसला येथील अनिल पालकर हा अवघ्या २४ वर्षांचा तरुण. शेतात बांधावर काम करीत असताना उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. दुखापत एवढी गंभीर होती की अनिलला चालणेच काय तर उभे राहणेही कठीण झाले होते. तपासणीअंती डॉक्टरांनी हिप रिप्लेसमेंट करावे लागेल असे सांगितले. त्यासाठी छत्रपती संभाजी नगरातील गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जवळपास अडीच लाख रुपयांचा खर्च लागणार होता. अचानक एवढ्या पैशांची व्यवस्था कशी होईल अशा चिंतेत असतांना चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून १ लाख रुपयांची मदत अनिलच्या उपचारासाठी मिळवून दिली. दीड महिन्यापूर्वी अनिलचे यशस्वी ऑपरेशन झाले."श्वेताताईंच्या मदतीमुळेच मी चालू शकलो, ताई माझ्यासाठी देवदूत बनून आल्या.. ताईंचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही" अशी प्रतिक्रिया अनिलने दिली...
संसार पुन्हा उभा झाला..
२ मुलं २ मुली आणि पत्नी असा संसाराचा गाडा मजुरी करून ओढणारे शेख जाबीर शेख इस्माईल यांची कहाणीही तशीच आहे. मिस्तरी काम करणाऱ्या जाबीर यांचं हातावरच पोट..मात्र अवघड काम करत असताना त्यांच्या खांद्याला दुखापत झाली. कामही करता येत नव्हते.त्यामुळे घरात पैसा येणार तरी कसा. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला.या ऑपरेशन साठी साधारणतः २ ते अडीच लाख रुपये लागणार होते.ही बाब जाबीर यांनी हक्काची बहीण असलेल्या श्वेताताईंना सांगितले. ताईंनी मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये जाबीर यांच्या उपचाराची व्यवस्था करून दिली. आता जाबीर यांचे यशस्वी ऑपरेशन झाले असून ते कामाला देखील लागले आहेत. श्वेताताई मुळेच मी पुन्हा काम करू शकलो..त्यामुळे पुन्हा ताईच पाहिजे अशी प्रतिक्रिया देताना जाबीर यांचा कंठ दाटून आला होता...