EXCLUSIVE युरोपमध्येही बाप्पाची थाटात स्थापना! मोताळ्यातील पिंप्री गवळीच्या गौरव कापसे या तरुणाचा पुढाकार! थेट युरोपातून "बुलडाणा लाइव्ह" ला कॉल... पहा व्हिडिओ
Sep 9, 2024, 21:53 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्रात आणि देशभरात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. परदेशात गेलेले भारतीय नागरिक देखील आपली संस्कृती टिकवून ठेवत तिथेही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. युरोपमधील स्लोव्हाकिया या देशात देखील मराठमोळ्या तरुणांनी आपली संस्कृती जपली आहे.विशेष म्हणजे यात बुलडाण्याच्या गौरव कापसे याचा देखील पुढाकार आहे. गौरव "बुलडाणा लाइव्ह" चा नियमित वाचक आहे, युरोपात असला तरी मायभूमी बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक अपडेट तो "बुलडाणा लाइव्ह" वर वाचत असतो.त्यानेच तिथल्या गणेशोत्सवाचा वृत्तांत "बुलडाणा लाइव्ह" ला फोन करून सांगितला आहे..
मूळचा मोताळा तालुक्यातील पिंप्री गवळी गावचा गौरव पुरुषोत्तम कापसे गेल्या दोन वर्षांपासून युरोपातील स्लोव्हाकिया या देशात आहे. तिथल्या नित्रा शहरात JLR या कंपनीत प्रोडक्शन असोशिएट म्हणून नोकरी करतो. त्याच्यासोबत निखिल बोऱ्हाडे (पुणे), केतन सोनार (जळगाव), प्रशांत भाटे, प्रशांत कोरडे प्रद्युम्न देशमुख जयेश शेलार (चाकण), ऋषिकेश चव्हाण (सातारा), तन्मय सुतार (पुणे) ही त्याची मराठमोळी मित्र कंपनी आहे..या मित्र कंपनीच्या पुढाकारातून तिथे गणेशोत्सव साजरा होत आहे..
गणेश चतुर्थीला मोठ्या उत्साहामध्ये गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. स्थापनेसाठी लागणारी मूर्ती प्रशांत कोरडे याने भारतातूनच युरोपला जात असतानाच नेली होती. तिथे १० दिवस हा गणेशोत्सव चालणार आहे..दररोज सकाळ संध्याकाळ आरती, बाप्पांसाठी मोदकाचा नैवेद्य, तसेच वेगवेगळे मराठमोळे पदार्थ बनवून नैवेद्य दाखवल्या जात आहे.रविवारी १५ सप्टेंबरला या सोहळ्याची सांगता होणार असल्याचे गौरव ने "बुलडाणा लाइव्ह" ला सांगितले..