ॲड. काझी यांच्याकडून पीक नुकसानीची पाहणी
सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात 19 व 20 फेब्रुवारीला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने रब्बी हंगामातील शेतकऱ्यांची पिके भूईसपाट झाली. जिल्ह्यातील सुमारे 18 हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, नुकसान ग्रस्त सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा, झोटींगा, देऊळगाव कोळ, डोरव्ही आदी भागांतील शेतीची पाहणी राष्ट्रवादी काँ जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी केली. अस्मानी संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने गहू, हरभरा, मका या पिकांसाठी हेक्टरी 50 हजार रुपये तर फळबाग कांदा पिकासाठी 1 लाख रुपये तसेच नेट शेडसाठी 1 लाख रुपये तातडीची मदत करावी, अशी मागणी ॲड. काझी यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना भेटून झालेल्या नुकसानीची माहिती त्यांना देणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवाजी राजे जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप मेहेत्रे, पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिगणे यांचे स्वीय संभाजी पेटकर, सरपंच भगवानराव उगले, माजी सरपंच बंडू उगले, देऊळगाव कोळ सरपंच राजू गायकवाड, संजय गायकवाड, उद्धव गायकवाड, डोरव्ही सरपंच बाळू पवार, उपसरपंच श्री. मुरकुट, माजी सरपंच उद्धव शेळके, वसंत मुरकुट, तुकाराम पंखुले. रत्नाकर पंखुले, दिनकर सोळंके, गजानन शेळके, प्रकाश मुरकुट, अनिल मुरकुटे, गणेश मुरकुटे आदी उपस्थित होते.