हॅलो हॅलो करून बुलडाणेकर हैराण…
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या दोन दिवसांपासून मोबाइलला रेंज राहत नसल्याने आणि त्यामुळे वारंवार कॉल खंडित होत असल्याने बुलडाणेकर हैराण झाले आहेत. घरात, बाहेर, गच्चीवर कुठेही जा नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे. जिओ, वोडाफोन, आयडिया या कंपन्यांच्या ग्राहकांना प्रामुख्याने हा मनस्ताप प्रामुख्याने होत आहे. 300 ते 400 रुपये महिन्याचे रिचार्ज करायचे आणि सेवेच्या बाबतीत मात्र …
Mar 12, 2021, 20:57 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या दोन दिवसांपासून मोबाइलला रेंज राहत नसल्याने आणि त्यामुळे वारंवार कॉल खंडित होत असल्याने बुलडाणेकर हैराण झाले आहेत.
घरात, बाहेर, गच्चीवर कुठेही जा नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे. जिओ, वोडाफोन, आयडिया या कंपन्यांच्या ग्राहकांना प्रामुख्याने हा मनस्ताप प्रामुख्याने होत आहे. 300 ते 400 रुपये महिन्याचे रिचार्ज करायचे आणि सेवेच्या बाबतीत मात्र हाल सोसायचे, अशी संतप्त भावना ग्राहकांनी व्यक्त केली आहे. कोरोनामुळे सध्या ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. मात्र मोबाइलला नेटवर्कच राहत नसल्याने विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे.