हरभरा शेतकऱ्यांना तारणार का? सोयाबीन मुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांची रब्बी हंगामात सर्वाधिक पसंती हरबऱ्याला; जिल्ह्यात तब्बल "एवढ्या" हेक्टर वर पेरणी...
Dec 5, 2024, 17:46 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात रब्बी पीक लागवडीचे क्षेत्र सरासरी २ लाख २७ हजार २१२.६२ हेक्टर असून, मंगळवारपर्यंत २ लाख १६ हजार ८२० हेक्टरवर रब्बीची पेरणी झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. एकूण ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील काही तालुक्यांत बुधवारी तुरळक स्वरूपाचा पाऊस बरसला. यामध्ये काढणीला आलेल्या फळबागा, भाजीपाला व इतर काही पिकांना काही प्रमाणात फटका बसल्याचे चित्र आहे.
यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना सिंचनाची सोय वेळीच उपलब्ध झाली. त्यामुळे ऑक्टोबर महिण्यापासून रब्बी पिकांच्या पेऱ्याला सुरूवात झाली होती. नोव्हेंबर अखेरीस बहुसंख्य शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली. यामध्ये आलू, जव, सरसो, कांदे, लसुण, राई, मटर यांसह बाजरी, ज्वारी, नाचणी, दादर, गहू, चने, हरभराआणि इतर पाले भाज्यांची लागवड करण्यात आली. सर्वाधिक गहू आणि ज्वारीची पेरणी झाल्याचे समजते. हरभरा लागवडीकरिताही असंख्य शेतकऱ्यांनी पसंती दिल्याचे दिसून आले. मात्र, मध्यंतरी या पिकांवर मर, किड रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. परिणामी उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी विभागाच्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे शेतकऱ्यांनी आपापल्या पिकाचे व्यवस्थापन केले. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने गहू आणि हरभरा पिकांना आवश्यक असलेल्या पोषक घटकांपासून वंचित राहावे, लागले. नव्हे तर जिल्ह्यातील दुर्गम भागात सिंचनाचा अनुशेष असल्याने त्या भागातील शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. रब्बी पीक उशिरा काढणीला येतात. त्यामुळे चांगले उत्पादन आणि खरीपातील नुकसान भरुन काढण्यासाठी जिल्ह्यातील लाखो शेतकरी झटत आहे.
सर्वाधिक हरभरा पिकाचा पेरा
जिल्ह्यातील तेराही तालुक्यात सर्वाधिक हरभरा पिकाची पेरणी पूर्ण झाली आहे. या पिकाचे सरासरी लागवड क्षेत्र १ लाख ४६ हजार ४३८ इतके असून, १ लाख ५६ हजार ३६४ हेक्टरवर हरभरा पेरल्या गेल्याची नोंद कृषी विभागात झाली आहे. सरासरीच्या तुलनेत हरभरा पिक अधिक असल्याचे चित्र आहे.