सुंदरखेड, कोलासर-सांगव्याला आता टँकरने पाणी
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तालुक्यातील सुंदरखेड व नांदुरा तालुक्यातील कोलासर, सांगवा या दोन गावांमधील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावांसाठी पाणी पुरवठ्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. सुंदरखेड येथील 13317 लोकसंख्येसाठी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. हा टँकर गावाला रोज 2 लक्ष 62 हजार 940 लिटर पाण्याचा पुरवठा करणार …
May 20, 2021, 18:33 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तालुक्यातील सुंदरखेड व नांदुरा तालुक्यातील कोलासर, सांगवा या दोन गावांमधील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावांसाठी पाणी पुरवठ्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे.
सुंदरखेड येथील 13317 लोकसंख्येसाठी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. हा टँकर गावाला रोज 2 लक्ष 62 हजार 940 लिटर पाण्याचा पुरवठा करणार आहे. कोलासर, सांगवा येथील 934 लोकसंख्येसाठी एक टँकर 18 हजार 680 लिटर पाणीपुरवठा करणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकाऱ्यांनी करावी. निविदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी (महसूल) बुलडाणा व मलकापूर यांनी कळविले आहे.