साखळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करा; आमदार सौ. श्वेताताई महाले यांची मागणी

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः साखळी गाव (ता. चिखली) वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असल्याने ते गैरसोयीचे होत आहे. त्यामुळे साखळी येथेच प्राथमिक आरोग्य केंद्रास मान्यता देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे. साखळी बुद्रूक येथे प्राथमिक आरोग्य केंद्र झाल्यास साखळी, अजीजपूर, येळगाव, …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः साखळी गाव (ता. चिखली) वरवंड प्राथमिक आरोग्य  केंद्राअंतर्गत असल्याने ते गैरसोयीचे होत आहे. त्यामुळे साखळी येथेच प्राथमिक आरोग्य केंद्रास मान्यता देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी जिल्‍हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे. साखळी बुद्रूक येथे प्राथमिक आरोग्य केंद्र झाल्यास साखळी, अजीजपूर, येळगाव, सव,अंत्री तेली, या व इतर गावांना अतिशय सोयीचे होणार आहे. साखळी येथे नियमित कोविशिल्ड लसीकरण केंद्र सुरू करून साखळी व परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणीसुद्धा आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी केली आहे.