साखरखेर्डा ः दासनवमी उत्‍सव साध्या पद्धतीने!

साखरखेर्डा (अनिकेत वाघमारे) ः साखरखेर्डा येथील श्री गोविंद रामानंद समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज रामदासी संस्थानात श्री दासनवमी व श्री सद्गुरू प्रल्हाद महाराज जन्मोत्सव सध्या साध्या पद्धतीने साजरा होत आहे. 7 मार्चपासून 13 मार्चपर्यंत हा सोहळा होत आहे. महोत्सव काळात मंदिरातच अभिषेक, पूजाअर्चा, महानैवेद्य उपासना आदी कार्यक्रम होत आहेत. मंदिर ३१ मार्चपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले …
 

साखरखेर्डा (अनिकेत वाघमारे) ः साखरखेर्डा येथील श्री गोविंद रामानंद समर्थ सद्‌गुरू प्रल्हाद महाराज रामदासी संस्‍थानात श्री दासनवमी व श्री सद्‌गुरू प्रल्हाद महाराज जन्‍मोत्‍सव सध्या साध्या पद्धतीने साजरा होत आहे. 7 मार्चपासून 13 मार्चपर्यंत हा सोहळा होत आहे.

महोत्‍सव काळात मंदिरातच अभिषेक, पूजाअर्चा, महानैवेद्य उपासना आदी कार्यक्रम होत आहेत. मंदिर ३१ मार्चपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. यंदाचा महोत्‍सव भाविकांनी घरीच राहून साजरा करावा, असे आवाहन संस्‍थानच्‍या विश्वस्त मंडळाने केले आहे.