संत चोखामेळा यांना पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी केले अभिवादन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संत चोखामेळा यांच्या जयंतीनिमित्त 13 जानेवारी रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी मेहुणा राजा येथे त्यांच्या शिल्पाला अभिवादन केले. कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संत चोखामेळा यांचा जन्मोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा झाला. यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, की मेहुणा राजा विकास आराखड्यासाठी निधी कमी पडू …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संत चोखामेळा यांच्या जयंतीनिमित्त 13 जानेवारी रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी मेहुणा राजा येथे त्यांच्या शिल्पाला अभिवादन केले. कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर संत चोखामेळा यांचा जन्मोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा झाला. यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, की मेहुणा राजा विकास आराखड्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. विकास आराखड्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी, अशा सूचनाही संबंधितांना दिल्या.