वाढदिवशी तरुणाने वाटप केले मास्क!; उमरदच्या तरुणाचा असाही उपक्रम
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः इंटरनेट आणि वाईट सवयींच्या अधीन होऊन आजची तरुणी पिढी सामाजिक भान हरवत चालल्याची टीका होत असते. पण टिकेला आपल्या सत्कार्यातून प्रत्युत्तर देण्याचे काम काही तरुण करत असतात. उमरद (ता. सिंदखेड राजा) येथील होतकरू तरुणाने कोरोनाविषयक जनजागृती करताना आपल्या वाढदिवशी मास्कचे वाटप केले. काल, 6 मे रोजी आपल्या गावपरिसरात त्याने हा उपक्रम राबवला.
अक्षय उबाळे असे या तरुणाचे नाव असून, त्याने कोरोनाला दूर ठेवण्यासाठी काय करता येईल, याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करत 100 मास्कचेही वाटप केले. या उपक्रमात त्याला संजय मुळे, नरहरी डोईफोडे, प्रकाश जाधव, अमोल आंधळे, आकाश नागरे, शिवाजी घोडके, कडूबा उबाळे, छगन उबाळे, विनोद उबाळे यांचे सहकार्य लाभले. सामाजिक कार्यात अक्षय सतत अग्रेसर असतो. त्याच्या उपक्रमाचे गावकऱ्यांनीही कौतुक केले.