रिंकू शर्माच्या हल्लेखोरांना फासावर चढवा; शेगाव, देऊळगाव राजात प्रशासनाला निवेदन
शेगाव/देऊळगाव राजा (ज्ञानेश्वर ताकोते/राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अयोद्ध्येतील श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन करून घरी परतणार्या दिल्लीमध्ये रिंकू शर्मा यांच्यावर हल्ला करून खून करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. पुन्हा अशा घटना घडणार नाहीत याची खबरदारी पोलीस प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलासह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी ठिकठिकाणच्या तहसीलदारांना निवेदन देत राष्ट्रपतींकडे केली.
देऊळगाव राजात निवेदन देताना विहिंपचे जिल्हा मंत्री वसंतराव पालवे, सुरज हनुमंते, डॉ. ऋषिकेश मांटे, सौरव गुठे, विवेक खांडेभराड, सिंधू कुरंगळ, धनंजय गिरीराम, विकास काकड, पवन पाडमुख, सुशील शिवाळे, संकेत पालवे, रोहित झोरे, वैभव कुहिरे, सूर्यकांत कुहिरे, वैभव भावे, सिंधू चव्हाण, ऋषिकेश मिसाळ आदी उपस्थित होते.
शेगावमध्ये निवेदन
शेगावमध्ये तहसीलदारांना निवेदन देताना विहिंप विभाग मंत्री चंद्रकांत घोराडे, जिल्हा सत्संग प्रमुख योगेश भारद्वाज, प्रखंड अध्यक्ष विजय राठी, तालुका संयोजक सोमेश कांबळे, विहिंप मंत्री सागर गलवाडे, बजरंग दल शहर संयोजक शुभम ढगे, गजानन हरणे, किरण देशमुख, हरिओम तिव्हाने, भारत चोपडे, नितीन पल्हाडे, विशाल वाघ, मोहित शर्मा, अतुल ठोंबरे, निसर्ग परकाळे, उमेश खेरडे, स्वप्नील शेगोकार, प्रथमेश कुलकर्णी, महेश पाटील यांच्या सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.