मेहकर ः सोनाटीत खंडोबाचा महोत्सव साध्या पद्धतीने

मेहकर (विष्णू आखरे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर तालुक्यातील सोनाटी येथील पुरातन खंडोबाचे मंदिर आहे. येथे जेजुरीच्या खंडोबाने विसावा घेतला होता आणि ही जागा त्यांच्या विसाव्याने पवित्र झाली होती. दरवर्षी येथे खंडोबाचा महोत्सव उत्साहात पार पडत असतो. भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. मात्र यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीने उत्सव होत आहे. मंदिर समितीने काहीच …
 

मेहकर (विष्णू आखरे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर तालुक्यातील सोनाटी येथील पुरातन खंडोबाचे मंदिर आहे. येथे जेजुरीच्या खंडोबाने विसावा घेतला होता आणि ही जागा त्यांच्या विसाव्याने पवित्र झाली होती. दरवर्षी येथे खंडोबाचा महोत्सव उत्साहात पार पडत असतो. भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. मात्र यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीने उत्सव होत आहे. मंदिर समितीने काहीच दुकानांना परवानगी दिली आणि नागरिकांना मास्क परिधान करूनच दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला आहे. शासनाच्या नियमाचे पालन केले जात असल्याचे या ठिकाणी दिसून आले. यावेळी डॉ. बद्रर, दिलिप अस्तरकर, डॉ. दिनकर बद्रर, उत्तम कातडे, भारत नालेगावकर, पंडितराव हूले, सुरेशराव वानखेडे व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.