मलकापूरवासियांच्‍या सेवेत अत्‍याधुनिक सुविधांयुक्‍त कार्डियक ॲम्‍बुलन्स!; भाईजी म्‍हणाले, …तर बुलडाणा अर्बन कायम त्‍यांच्‍या पाठिशी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ॲम्बुलन्स आणि स्वर्गरथासाठी सेवाभावी संस्था किंवा दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन 50 टक्के हिस्सा उचलला तर बुलडाणा अर्बन कधीही 50 टक्के हिस्सा उचलेल, असे प्रतिपादन बुलडाणा अर्बन बँकेचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनी केले. बुलडाणा अर्बन आणि गुरूलीला निहलानी यांच्या संयुक्त विद्यमाने अत्याधुनिक सर्व सुविधांयुक्त कार्डियक ॲम्बुलन्सचे लोकार्पण 25 मे रोजी करण्यात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः ॲम्‍बुलन्स आणि स्‍वर्गरथासाठी सेवाभावी संस्‍था किंवा दानशूर व्‍यक्‍तींनी पुढाकार घेऊन 50 टक्‍के हिस्सा उचलला तर बुलडाणा अर्बन कधीही 50 टक्‍के हिस्सा उचलेल,  असे प्रतिपादन बुलडाणा अर्बन बँकेचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनी केले.

बुलडाणा अर्बन आणि गुरूलीला निहलानी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने अत्‍याधुनिक सर्व सुविधांयुक्‍त कार्डियक ॲम्‍बुलन्सचे लोकार्पण 25 मे रोजी करण्यात आले. त्‍यावेळी श्री. चांडक बोलत होते. माजी नगराध्यक्ष नारायणदास निहलानी यांच्‍या पुढाकारातून व बुलडाणा अर्बनच्‍या माध्यमातून ही कार्डियक ॲम्‍बुलन्स मलकापूरवासियांसाठी उपलब्‍ध झाली आहे.  यावेळी श्री. चांडक म्‍हणाले, की बुलडाणा अर्बनने हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केल्यानंतर राज्‍यभरातून अनेक ठिकाणांवरून प्रस्‍ताव आले. त्‍यानुसार अनेक ठिकाणी ॲम्‍बुलन्स आणि स्वर्गरथ सेवा देण्यात येत आहे. यापुढेही कुणी पुढे येत असेल तर बुलडाणा अर्बन त्‍यांच्‍या पाठिशी निश्चित उभे राहील, असे ते म्‍हणाले.