मनोज दांडगे यांची कोरोनामुक्‍त रथयात्रा ः 15 हजार मास्‍क वाटप, शिबिरात 55 दात्‍यांचे रक्‍तदान

बुलडाणा (मनोज सांगळे मो. 9822988820 ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज दांडगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत धाड येथील ज्ञानदेवराव बापू दांडगे ज्ञानमंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयात नुकतेच रक्तदान शिबिर घेण्यात आली. यावेळी 55 दात्यांनी रक्तदान केले. श्री. दांडगे यांनी कोविड लसीकरण व रक्तदान शिबिराबद्दल जनजागृतीसाठी काढलेल्या कोरोनामुक्त रथाच्या …
 

बुलडाणा (मनोज सांगळे मो. 9822988820 ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज दांडगे यांच्‍या आवाहनाला प्रतिसाद देत धाड येथील ज्ञानदेवराव बापू दांडगे ज्ञानमंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयात नुकतेच रक्‍तदान शिबिर घेण्यात आली. यावेळी 55 दात्‍यांनी रक्‍तदान केले.

श्री. दांडगे यांनी कोविड लसीकरण व रक्‍तदान शिबिराबद्दल जनजागृतीसाठी काढलेल्या कोरोनामुक्‍त रथाच्‍या माध्यमातून मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमधील 21 गावांत 15 हजार एन-95 मास्‍क वाटप केले. 11 मे रोजी गुम्‍मीत सरपंच सौ. दीपाली हुंडीवाले, उपसरपंच विठ्ठल कड व राष्ट्रवादी काँग्रेसच्‍या पदाधिकाऱ्यांच्‍या उपस्‍थितीत रथाचा समारोप झाला. धाडमध्ये पार पडलेल्या शिबिरप्रसंगी नीलेश देठे, विजय धंदर, सौ. निर्मला तायडे, गजानन पालकर, पांडुरंग पवार, समाधान फुसे, प्राचार्य संतोष डवले, जगन कानडजे, नीलेश हिवाळे, सागर हिवाळे, रामेश्वर पाटील आदी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची उपस्‍थिती होती.