मतदान, मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यात मद्य विक्री बंद

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. तसेच 18 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे व मतदारांवर प्रभाव टाकणार्या वस्तूंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत सर्व दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. तसेच 18 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे व मतदारांवर प्रभाव टाकणार्‍या वस्तूंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत सर्व दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. महाराष्ट्र देशी दारू नियमावली 1973 व मुंबई विदेशी मद्य नियमावली 1969 चे नियमानुसार मतदानाच्या दिवशी 15 जानेवारी रोजी व मतमोजणी दिवशी 18 जानेवारी रोजी संपूर्ण दिवस मद्य विक्री बंद असणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिले आहेत.