प्रदेश काँग्रेस मागासवर्गीय सेल अध्यक्षांची लोणार सरोवराला भेट

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रदेश काँग्रेस मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष विजय अंभोरे यांनी सहकुटुंब लोणार सरोवराला 13 मार्चला दुपारी भेट दिली.लोणार नगरपालिकेने टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या सेल्फी पॉइंटला त्यांनी भेट दिली. नगराध्यक्षा सौ. पूनम पाटोळे श्री. अंभोरे व त्यांच्या पत्नींचा सत्कार केला. यावेळी उपनगराध्यक्ष बादशाह खान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साहेबराव पाटोळे, माजी …
 

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः प्रदेश काँग्रेस मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष विजय अंभोरे यांनी सहकुटुंब लोणार सरोवराला 13 मार्चला दुपारी भेट दिली.
लोणार नगरपालिकेने टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या सेल्फी पॉइंटला त्‍यांनी भेट दिली. नगराध्यक्षा सौ. पूनम पाटोळे श्री. अंभोरे व त्यांच्या पत्‍नींचा सत्कार केला. यावेळी उपनगराध्यक्ष बादशाह खान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साहेबराव पाटोळे, माजी उपनगराध्यक्ष शेख समद शेख अहमद, माजी आरोग्य सभापती सौ. योगिता पाटोळे, माजी उपनगराध्यक्ष साफिया बेगम, माजी नगरसेवक अंबादास इंगळे, फय्याज खान, मनिष पाटोळे, अनिल पाटोळे उपस्थित होते. लोणार पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष शेख समद यांनी काँग्रेस प्रदेश मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष विजय अंभोरे यांना लोणार सरोवराची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्‍कार केला.