पदाचा दुरुपयोग भोवला! जऊळका येथील सरपंच अपात्र

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः पदाचा दुरुपयोग केल्या प्रकरणी अखेर जऊळका (ता. सिदखेड राजा) येथील सरपंच येथील श्रीमती द्वारकाबाई प्रभाकर सांगळे पदावरून पायउतार झाल्या आहेत. त्यांच्या अपात्रतेवर ग्रामविकास राज्यमंत्र्यांनीही शिक्कामोर्तब केले आहे. उपसरपंच नामदेव मसाजी बुधवत यांनी विभागीय आयुक्तांकडे सरपंच द्वारकाबाई प्रभाकर सांगळे यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. त्यात ग्रामपंचायतीला प्राप्त निधी लाटल्याचा …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः पदाचा दुरुपयोग केल्या प्रकरणी अखेर जऊळका (ता. सिदखेड राजा) येथील सरपंच येथील श्रीमती द्वारकाबाई प्रभाकर सांगळे पदावरून पायउतार झाल्या आहेत. त्‍यांच्‍या अपात्रतेवर ग्रामविकास राज्‍यमंत्र्यांनीही शिक्कामोर्तब केले आहे.

उपसरपंच नामदेव मसाजी बुधवत यांनी विभागीय आयुक्तांकडे सरपंच द्वारकाबाई प्रभाकर सांगळे यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. त्‍यात ग्रामपंचायतीला प्राप्‍त निधी लाटल्‍याचा आरोप करण्यात आला होता. चौकशीअंती विभागीय आयुक्‍तांनी सरपंच सांगळे यांना अपात्र घोषित केले होते. त्‍याविरोधात ग्रामविकास राज्‍यमंत्र्यांकडे सरपंचांनी अपील केले होते. मात्र तिथेही ते फेटाळण्यात आले आहे. सरपंच म्हणून कर्तव्य पार पाडण्यात कसूर केल्याचे दिसून आल्‍यामुळे अपात्र ठरवल्याचा आदेश अप्पर सचिव नीला राठोड यांनी काढला आहे.