नांदुरा येथे हवा महत्त्वाच्या गाड्यांना थांबा!
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा हे पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे शहर असून या शहराला अनेक लहान मोठी गाव व बाजारपेठा जोडल्या गेल्या आहेत. या अनुषंगाने नांदुरा शहरात आझाद हिंद एक्स्प्रेस व जयपूर हैदराबाद या महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी केंद्रीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य डॉ. राजेंद्रजी फडके यांच्याकडे नांदुरा अर्बन अध्यक्ष …
Jan 24, 2021, 09:18 IST
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा हे पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे शहर असून या शहराला अनेक लहान मोठी गाव व बाजारपेठा जोडल्या गेल्या आहेत. या अनुषंगाने नांदुरा शहरात आझाद हिंद एक्स्प्रेस व जयपूर हैदराबाद या महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी केंद्रीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य डॉ. राजेंद्रजी फडके यांच्याकडे नांदुरा अर्बन अध्यक्ष तथा रेल्वे सल्लागार समिती सदस्य अरुण पांडव, शहर भाजपा महिला आघाडी अध्यक्षा तथा रेल्वे सल्लागार समिती सदस्या सारिका राजेश डागा, शहर रेल्वे सल्लागार समिती सदस्य स्वप्नील झाबंड यांनी निवेदनाद्वारे केली. नांदुरा रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांच्या सोयीसाठी कोच इंडिकेटर डिजिटल डिस्प्ले सेवा लवकरात लवकर पुरविण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.