नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन सिद्धेश्वर गेले देवा घरी…
लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लोणार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच तालुका काँग्रेसचे ग्रामीण सचिव सिद्धेश्वर दहातोंडे (42) यांचे आज, 1 जानेवारीला दुपारी 12.30 वाजता दरम्यान हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मित्र परिवाराला नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्हॉट्स अॅपवरून देऊन सिद्धेश्वर आज देवाघरी निघून गेल्याचे कळताच त्यांचा मित्रपरिवार अक्षरशः हादरला. दहातोंडे हे …
Jan 1, 2021, 19:58 IST
लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लोणार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच तालुका काँग्रेसचे ग्रामीण सचिव सिद्धेश्वर दहातोंडे (42) यांचे आज, 1 जानेवारीला दुपारी 12.30 वाजता दरम्यान हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मित्र परिवाराला नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्हॉट्स अॅपवरून देऊन सिद्धेश्वर आज देवाघरी निघून गेल्याचे कळताच त्यांचा मित्रपरिवार अक्षरशः हादरला. दहातोंडे हे लोणार तालुक्यातील कोयाळी येथील रहिवासी होते. लेखणीतून त्यांनी ग्रामीण पत्रकारिता करताना अनेक प्रश्नांना हात घालून सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून दिला.