दुसरबीडला आमदार संजय कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील दुसरबीड येथे जिल्हा परिषद शेष फंडातून दहा लाख रुपयाच्या सिमेंट रस्त्याचे आज, 7 मार्चला भूमिपूजन करण्यात आले. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद वाघ यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. श्री. वाघ यांनी जिल्हा परिषद शेष फंडातून दुसरबीडसाठी दहा लाख रुपये व किनगावराजासाठी दहा लाख रुपये शेष फंड …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील दुसरबीड येथे जिल्हा परिषद शेष फंडातून दहा लाख रुपयाच्या सिमेंट रस्त्याचे आज, 7 मार्चला भूमिपूजन करण्यात आले. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद वाघ यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. श्री. वाघ यांनी जिल्हा परिषद शेष फंडातून दुसरबीडसाठी दहा लाख रुपये व किनगावराजासाठी दहा लाख रुपये शेष फंड दिला. यात आज दुसरबीड येथील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन झाले. या वेळी सरपंचपती प्रकाशराव सांगळे, वैभव देशमुख, छगन खंदारे, विलास आघाव, रामेश्वर काळुशे, शिवशंकर डोईफोडे, शेषराव सांगळे, भगवान कायंदे, अनिल सांगळे यांच्यासह वॉर्डातील नागरिक उपस्थित होते.