दुसरबीडमध्ये रस्त्याचे भूमिपूजन
दुसरबीड (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दुसरबीड येथील वाॅर्ड क्रमांक दोनमधील गजानन महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व दुसरबीड परिवर्तन विकास पॅनलच्या या विकासकामाच्या उद्घाटनाचा नारळ सिंदखेडराजा पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव देशमुख, माजी सभापती इरफान अली, दुसरबीडचे सरपंचपती प्रकाशराव सांगळे, उपसरपंच तौफिक …
Mar 6, 2021, 12:50 IST
दुसरबीड (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दुसरबीड येथील वाॅर्ड क्रमांक दोनमधील गजानन महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.
गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व दुसरबीड परिवर्तन विकास पॅनलच्या या विकासकामाच्या उद्घाटनाचा नारळ सिंदखेडराजा पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव देशमुख, माजी सभापती इरफान अली, दुसरबीडचे सरपंचपती प्रकाशराव सांगळे, उपसरपंच तौफिक शेख, गजानन देशमुख, सुधीर निकम, बंटी छाजेड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिकांच्या उपस्थित फोडण्यात आला.