दुसरबीडच्या सरपंचपदी सौ. ज्योती सांगळे

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील दुसरबीडच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत परिवर्तन पॅनलच्या सौ.ज्योतीताई प्रकाशराव सांगळे तर उपसरपंचपदी सौ. आलियाअंजुम शेख तौफिक यांची बिनविरोध निवड झाली आहे.जिल्हा परिषद सदस्यपती पंडीतराव खंदारे, पं.स.सभापती पती विलासराव देशमुख व माजी उपसभापती इरफान अली शेख यांच्या प्रयत्नांतून 17 पैकी 13 उमेदवार परिवर्तन पॅनलचे विजयी झाले होते. 15 जानेवारीला …
 

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील दुसरबीडच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत परिवर्तन पॅनलच्या सौ.ज्योतीताई प्रकाशराव सांगळे तर उपसरपंचपदी सौ. आलियाअंजुम शेख तौफिक यांची बिनविरोध निवड झाली आहे.
जिल्हा परिषद सदस्यपती पंडीतराव खंदारे, पं.स.सभापती पती विलासराव देशमुख व माजी उपसभापती इरफान अली शेख यांच्या प्रयत्नांतून 17 पैकी 13 उमेदवार परिवर्तन पॅनलचे विजयी झाले होते. 15 जानेवारीला पार पडलेल्या निवडणुकीनंतर सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीची चुरस लागली होती. आज दि.10 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता ग्रामपंचायत विशेष सभा ग्रामपंचायत कार्यालयात बोलावण्यात आली होती. सभेपूर्वी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात आली. या कालावधीत सरपंच पदासाठी सौ.ज्योतीताई प्रकाशराव सांगळे यांचे एकमेव नाम निर्देशनपत्र प्राप्त झाले तर उपसरपंच पदासाठी सौ. आलिया अंजुम शेख तौफिक यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. सभेस एकूण 17 सदस्यांपैकी 13 सदस्य उपस्थित होते. सभेस आवश्यक गणपूर्ती झाल्याने सभेचे कामकाज सुरू करण्यात आले. सरपंच पदासाठी सौ.ज्योतीताई प्रकाशराव सांगळे तर उपसरपंच पदासाठी सौ. आलियाअंजुम शेख तौफिक यांचे एकमेव अर्ज आल्याने व छाननीअंती वैध ठरल्याने निवडणूक अधिकारी ए. यू. म्हस्के यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी ग्रामसेवक संजय चौधरी, पटवारी राहुल देशमुख हजर होते.