‘त्‍या’ ग्रा.पं. कर्मचाऱ्याच्‍या कुटुंबियांना लोकजागरकडून ११ हजारांची मदत

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे दोन दिवसांपूर्वी अनेकांच्या काळजाला चटका लावून जाणारी दुर्दैवी घटना घडली. सतत सेवाभाव मनात ठेवून काम करणारे, त्याच बरोबर संपूर्ण गावची तहान भागवणारे सर्वांचे लाडके ग्रामपंचायत कर्मचारी विश्वंबर श्रावण मांजरे यांचा वीज खांबावर काम करताना शॉक लागून मृत्यू झाला. सामाजिक उपक्रमांत कायम …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे दोन दिवसांपूर्वी अनेकांच्या काळजाला चटका लावून जाणारी दुर्दैवी घटना घडली. सतत सेवाभाव मनात ठेवून काम करणारे, त्याच बरोबर संपूर्ण गावची तहान भागवणारे सर्वांचे लाडके ग्रामपंचायत कर्मचारी विश्वंबर श्रावण मांजरे यांचा वीज खांबावर काम करताना शॉक लागून मृत्यू झाला. सामाजिक उपक्रमांत कायम पुढाकार घेणाऱ्या लोकजागर परिवारातर्फे मांजरे यांच्‍या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली. 11 हजार रुपयांची मदत त्यांच्या मुलाकडे सुपूर्द केली. यावेळी परिवाराच्या वतीने प्रविण गिते, पवन दाभेरे, भगवान साळवे आदी उपस्थित होते.