तैलिक महासभेच्या जिल्हाध्यक्षांनी केला मुकुंदा खेडकर यांचा सत्कार
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोेते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव येथील तैलिक महासभा युवा आघाडीचे विदर्भ संघटन सचिव मुकुंदा खेडकर यांची भाजपच्या शेगाव चिटणीसपदी नियुक्ती झाली आहे. याच निमित्ताने तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष नंदूभाऊ काटोके यांनी शेगावला सदिच्छा भेट देऊन चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल मुकुंदा खेडकर यांचा सत्कार केला. श्री. खेडकर यांच्या हातून असेच सामाजिक कार्य घडत राहो, …
Jan 24, 2021, 16:17 IST
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोेते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव येथील तैलिक महासभा युवा आघाडीचे विदर्भ संघटन सचिव मुकुंदा खेडकर यांची भाजपच्या शेगाव चिटणीसपदी नियुक्ती झाली आहे. याच निमित्ताने तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष नंदूभाऊ काटोके यांनी शेगावला सदिच्छा भेट देऊन चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल मुकुंदा खेडकर यांचा सत्कार केला. श्री. खेडकर यांच्या हातून असेच सामाजिक कार्य घडत राहो, असा सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी रमेश अकोटकर व प्रतुल अवचार यांची उपस्थिती होती.