डॉ. विशाल इंगोले यांचा दुसरबीडमध्ये सत्‍कार

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या सदस्यपदी कवी डॉ. विशाल इंगोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. इंगोले यांच्या माझ्या हयातीचा दाखला या कवितासंग्रहाची साहित्यिक आणि वाचकांनी विशेष दखल घेतल्याने त्यांना तब्बल 18 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्कार व विश्वकोश निर्मिती मंडळावर झालेल्या निवडीबद्दल त्यांचा दुसरबीड …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्‍या सदस्यपदी कवी डॉ. विशाल इंगोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. इंगोले यांच्या माझ्या हयातीचा दाखला या कवितासंग्रहाची साहित्यिक आणि वाचकांनी विशेष दखल घेतल्याने त्यांना तब्बल 18 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्कार व विश्वकोश निर्मिती मंडळावर झालेल्या निवडीबद्दल त्यांचा दुसरबीड येथे आम्ही दुसरबीडकर मित्र मंडळातर्फे सत्‍कार करण्यात आला. यावेळी डॉ. नरेश बोडखे, लोकजागर परिवाराचे प्रवीण गिते यांची भाषणे झाली. आभार संतोष पुरी यांनी मानले.