डॉ. पृथ्वीराज पिडियार यांनी बुलडाण्याच्या लौकिकात घातला भर!; ही परीक्षा उत्तीर्ण होणारे जिल्ह्यात पहिलेच!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आयुष मंत्रालय भारत सरकार व पतंजली योगपीठ हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मान्यताप्राप्त YCB Level 3 (Yoga Teacher And Evaluator) परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात डॉ. पृथ्वीराज पिडीयार यांना 400 पैकी 386 (1) आणि 200 पैकी 157 (3) गुण मिळाले असून, ते अ श्रेणी प्राप्त करून प्राविण्य …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आयुष मंत्रालय भारत सरकार व पतंजली योगपीठ हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मान्यताप्राप्त YCB Level 3 (Yoga Teacher And Evaluator) परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात डॉ. पृथ्वीराज पिडीयार यांना 400 पैकी 386 (1) आणि 200 पैकी 157 (3) गुण मिळाले असून, ते अ श्रेणी प्राप्त करून प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ही परीक्षा बुलडाणा जिल्ह्यातून प्रथमच पास होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे. या परीक्षेद्वारे त्यांना आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक म्हणून परदेशात जाण्याची संधी प्राप्त होईल. तसेच त्यांना योग शिक्षकाच्या शासकीय नोकरीत प्राधान्य राहील. डॉ. पृथ्वीराज  हे श्री सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय नाशिकचे आयुर्वेदाचे विद्यार्थी असून, ते योग व आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी आयुष्याकरिता निशुल्क जनजागृती करतात.