डॉ.गायत्री सावजी यांना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महा एनजीओ फेडरेशन, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय स्त्री सन्मान पुरस्कार समाजसेवेत कायम अग्रेसर राहणाऱ्या डॉ. गायत्री प्रकाश सावजी यांना ८ मार्च रोजी ऑनलाइन पद्धतीने प्रदान करण्यात आला.
डॉ. गायत्री सावजी यांनी दोनशेहून अधिक खेड्यांमध्ये जाऊन महिला सबलीकरण, समाज प्रबोधन केले आहे. सोबतच वृक्षारोपण, प्लास्टिक बंदीचे मोठे काम त्यांनी केले आहे. शैक्षणिक साहित्य वाटप, मोफत आरोग्य शिबीर असे अनेक कार्य त्यांनी केले आहेत. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुणे येथे स्नेहा देव (गटविकास अधिकारी पुणे) आणि आरती गोखले (एसटीसीसी पुणे) तसेच संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा, सहसंस्थापक विजय वरुडकर, संचालक मुकुंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी सहाला ऑनलाइन पद्धतीने या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कार्यक्रमाला होणारी गर्दी टाळण्यासाठी संस्थेने पुरस्कार सोहळा ऑनलाइन पद्धतीने घेतला. डॉ.गायत्री सावजी यांच्या कार्याचे स्वरूप पाहून महाराष्ट्र शासनास सोबतच अनेक संघटनांनी यांना सन्मानित करून त्यांच्या कामाची पोचपावती या माध्यमातून देण्यात आली आहे.